रा.जि.प.शाळा खारी येथे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण व मेळावा उत्साहात संपन्न

विद्यार्थी व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग

खारी/रोहा-केशव म्हस्के

                      रोहे तालुक्यातील आरे बु.केंद्रांतर्गत रा.जि.प.प्राथमिक शाळा खारी येथे शाळा पूर्वतयारी प्रशिक्षण व मेळावा मंगळवार दि.१९ एप्रिल रोजी उत्साहात संपन्न झाला.

      मेळाव्याची सुरुवात प्रमुख पाहुणे,स्कूल कमिटी कार्यकारणी मंडळाचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन व विद्येची देवता श्री सरस्वती पूजनाने करण्यात आली. उपस्थितांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत करण्यात आले.

रोहा.पं.समिती गट शिक्षणाधिकारी सादूराम बांगारे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली व मुख्याध्यापिका सुजाता मोकल यांच्या लाभलेल्या विशेष सहकार्याने संपन्न झालेल्या या मेळाव्याप्रसंगी पदवीधर शिक्षक श्री.मंगेश शरमकर सर व सायली दिवकर मॅडम या तज्ञ मार्गदर्शकांनी शाळा पूर्वतयारी प्रशिक्षणाची संपूर्ण रुपरेषा सांगून उद्दिष्ट सांगितली ,कोरोना काळात विद्यार्थ्यांचा मागिल तीन वर्षाचा झालेला लर्निंग लाँस भरून काढणे,इ.१ लीत दाखल होणार्-या विद्यार्थ्यांची तयारी करणे,शिकविण्यासाठी प्रेरित करण्यासाठी स्वतः साक्षर असलेच पाहिजे हे पालकांना पटवून देणे आदीबाबत बहुमोल असे मार्गदर्शन केले.सदर प्रशिक्षणात रा.जि.प.प्राथमिक शाळा खारी येथील विद्यार्थ्यांनी प्रत्यक्षात सहभाग घेतला.या विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल-ताशा व लेझिम पथकाने तसेच प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले.

   यावेळी स्कूल कमिटी अध्यक्ष दत्तात्रेय काळे यांच्या समवेत काशिनाथ टिकोणे,केशव म्हस्के, अंगणवाडी सेविका मिताली खिरीट,सहाय्यक सुनिता खिरीट,सिद्दू भोईर,दिपाली दिलीप घाग,आदी पालक व विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    तर मेळाव्याचे यशस्वीतेसाठी मुख्याध्यापिका सुजाता मोकल व सहा. शिक्षिका सायली दिवकर,पदवीधर शिक्षक मंगेश शरमकर,पुंडलिक शिर्के गुरुजी यांनी मोलाचे सहकार्य केले.

Comments

Popular posts from this blog