श्री क्षेत्र किल्ला हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्द बालेकिल्ला राहावा,जोमाने कामाला लागा- खासदार सुनिल तटकरे यांचे कार्यकर्त्यांना आवाहन 


रोहा-शरद जाधव

आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. साडेतीन मुहूर्तांपेकी एक मुहूर्त आहे. त्यामुळे कुठे मुहूर्त काढायची गरज नाही म्हणून  किल्ला या गावी आज आपण विकासाची गुढी उभी करीत असल्याचे वक्तव्य खासदार सुनिल तटकरे यांनी काढले. श्री क्षेत्र किल्ला हा अभेद्द असा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला राहावा, याकरिता कार्यकर्त्यांनी जोमाने पक्षाच्या कामाला लागावे असे आवाहन ही तटकरे यांनी केले. 



    वाकेश्वर मंदिराच्या जिर्णोध्दार सोहळा वाढीव निधी 25 लाखाच्या व किल्ला अशोक नगर रस्त्याच्या सुमारे दिड कोटी रक्कमेच्या कामाचे भुमीपूजन खासदार सुनिल तटकरे यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते.

      व्यासपिठावर आमदार अनिकेत तटकरे,कार्याध्यक्ष  मधुकर पाटील , तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर,तालुका समन्वय समिती अध्यक्ष विजयराव मोरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, जेष्ठ नेते शंकरराव भगत ,अनिल भगत, रोहिदास पाशिलकर ,युवक अध्यक्ष जयवंत मुंडे,रामा म्हात्रे,यशवंत रटाटे,प्रदीप बामूगडे,साळुंखे, सतिश भगत,गुणाजी पोटफोडे, केशव भोकटे, आदी मान्यवर उपस्थित होते. 



 खासदार सुनिल तटकरे पुढे म्हणाले की, किल्ला गावचा उंबरठा मोठा आहे. असे असताना सर्व गाव एकसंघ होऊन मंदीर बांधण्याचा निर्णय घेतला.हे कौतुकास्पद आहे.आमदार अनिकेत तटकरे यानी 15 लाख रुपये निधी दिला. तो निधी कमी पडेल असे मला संगितलेत. याची त्वरित दखल पालकमंत्री आदिती यांनी घेत वाढीव 25 लाखांचा निधी उपलब्ध करून मंजूर देखील केला आहे. आता तुम्हाला काम करण्यास कोणतीही अडचण नाही. त्यामुळे काम जलद गतीने व दर्जेदार करा असे सांगितले. 

अशोकनगर ते किल्ला रस्त्याची समस्या खुप भेडसावत होती. ते काम हाती घेत सुमारे दिड कोटींचा निधी रस्त्याकरिता मंजूर होऊन सदर काम 2 महिन्यात पूरे होइल.त्यामुळे किल्ला गावचे नागरीकरण त्या रस्त्याला भविष्यात अधिक वाढेल.पिण्याच्या पाण्याची 1 कोटी 28 लाखांची योजना लवकरच लोकार्पण होईल.  सर्वच विकासाच्या योजना आता मार्गी लागल्या आहेत. त्यामुळे पुढे या गावचे भवितव्य उज्वल असून या गावचा एकसंघपणा चिरकाल टिकावा असे मत सुनिल तटकरे यानी व्यक्त केले.

           या देशात आपले सरकार नाही तरी घटनेने दिलेल्या अधिकारावर सभागृहात जनतेचे प्रश्न मांडत आहे,त्यामुळे भविष्यात तुमच्या पाठबळाची गरज असल्याचे ही ते म्हणाले.आगामी निवडणूकांसाठी या मतदार संघात जोमाने कामाला लागा असे आवाहन खासदार सुनिल तटकरे यांनी केले.

                       प्रदीप बामूगडे यांनी ,साहेब तुमचे आमच्यावर विकासाच्या बाबाबतीत करोडोचे कर्ज झाले आहे ते ऋण फेडणार असे सांगताच," प्रदिप खोत ,व्याज नको फक्त मतांची मुदद्ल द्या "असे तटकरे साहेब बोलताच, उपस्थितांत हशा पिकला.

            कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवी दिघे यांनी केले तर प्रास्ताविक व आभार महेश बामूगडे यांनी मानले.

              कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नारायण भोईर, चंद्रकांत बामूगडे,जयवंत मुंडे, सरपंच योगेश बामूगडे,प्रदीप बामूगडे, विष्णू लोखंडे, नरेश बामूगडे,  रुपेश बामूगडे,अनिल नाकटे,महेश बामूगडे,रघुनाथ बामूगडे, उपसरपंच राकेश बामूगडे,शिवाजी रटाटे,अजय बामुगडे रवी दिघे,दिपक जमदाडे,समीर वाळंज,भाऊ महाराज दळवी,पांडूरंग दळवी ,नरेश चांदोरकर,माधुरी लोखंडे,यशवंत कडव,संतोष घायले,जनार्दन वागलकेर,महादेव लोखंडे,केशव मुंडे,संजय दळवी,भगवान जमदाडे ,जनार्दन बामूगडे,रोहिदास भोईर, संदीप करकरे,विलास बामूगडे, नितीन बामूगडे,शरद मुंडे, रविंद्र रटाटे,महेश भोकटे, नितीन जंगम, रोशन बामूगडे, अनंत गोरे, ग्रामस्थ तरुण वर्ग महिला मंडळ यानी अथक मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog