पिंगळसई केंद्रातर्फे श्री.दिनेश कडव सरांचा सत्कार
रोहा-प्रतिनिधी
समर्थ वैभव वृत्तपत्राचा २०२२ या वर्षाचा जिल्हास्तरीय आदर्श किर्तनकार पुरस्कार मिळाल्याबद्दल श्री.दिनेश कडव सर शाळा-वांदोली आदिवासीवाडी ता.रोहा यांचा पिंगळसई केंद्राच्यावतीने सत्कार करण्यात आला.केंद्रप्रमुख सौ.रश्मी साळी यांचे शुभहस्ते श्री.दिनेश कडव सरांना सन्मानित करणेत आले.यावेळी व्यासपिठावर केंद्रप्रमुख सौ.रश्मी साळी यांचे समवेत पत्रकार रविना मालुसरे,धामणसई मुख्याध्यापक घनश्याम म्हात्रे,पिंगळसई मुख्याध्यापक राजाराम खरिवले,मालसई मुख्याध्यापिका पुष्पलता शिंदे,गावठण मुख्याध्यापक पाटील ,सोनगांव मुख्याध्यापिका वैशाली वेळे मॕडम,टिकुळे सर,तिपुळे सर,अनिता पाटील,अमोल म्हस्के,शिंदे सर,दिपक मांडलुस्कर व शिक्षक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
आपली शैक्षणिक सेवा उत्तमरितीने सांभाळून श्री.दिनेश कडव सरांनी वारकरी संप्रदायाची पताका खांद्यावर घेतली आहे.धामणसई पंचक्रोशी मधील वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी आपले स्थान निर्माण केले आहे.ह.भ.प.दिनेश कडव महाराज या नावाने किर्तन क्षेत्रात अल्पावधीत नाव निर्माण केले आहे."भाई"ह्या टोपण नावाने ते परिसरात सुपरिचित आहेत.साधी राहणी,उच्च विचार,नम्रता व क्रियाशीलता ह्या गुणांमुळे ते सर्वांना आपले वाटतात.त्यांच्या कार्याची दखल घेत,"समर्थ वैभव वृत्तपत्राचा" २०२२ या वर्षाचा जिल्हास्तरीय आदर्श किर्तनकार पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली.त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल पिंगळसई केंद्राने त्यांना सन्मानित केले.यावेळी श्री.दिनेश कडव यांच्या यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करुन पुढिल वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
Comments
Post a Comment