मेढा विभाग राष्ट्रवादीचाच बालेकिल्ला; कोण इकडे-तिकडे गेले तरी बालेकिल्ला कधीच हलणार नाही--- खासदार सुनिल तटकरे
रोहा-शरद जाधव
ब-याच वर्षांपूर्वी मा.मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांना मेढा या ठिकाणी पाणी योजनेसाठी आणले होते.त्यावेळी या विभागातील अनेक जेष्ठ बुजूर्ग मंडळींनी आम्हांला राजकारणात ताकद मिळवून दिली.स्व.अण्णा देखील या विभागातून निवडून आले. तेव्हापासून आजपर्यंत या विभागात ऋणानुबंधांचे नाते दृढ झाले आहे. व ते नाते आजदेखील अनिकेत व आदिती जपत आहेत.म्हणूनच ४३ वर्षांनंतर सुद्धा मेढा विभाग राष्ट्रवादीचा बालेकिल्लाच राहिला असून कोण इकडे तिकडे गेले तरी बालेकिल्ला कधीच हलणार नसल्याचा ठाम विश्वास खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केला आहे.
रोहे तालुक्यातील मेढा हनुमान आळी येथे श्री हनुमान मंदिर मंडप सभागृह लोकार्पण सोहळ्यानिमित्त उपस्थितांसमोर ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आमदार अनिकेत तटकरे, मा.सभापती राजेश्री पोकळे,महिला तालुकाध्या प्रितम पाटील, सरपंच स्नेहा खैरे,अनंत देशमुख, राजेंद्र पोकळे,भगवान गोवर्धने,मयूर खैरे,गजानन खांडेकर, रघुनाथ करंजे,अप्पा देशमुख, मयूर दिवेकर, चंद्रकांत ठमके,संदीप चोरगे,संतोष भोईर,तानाजी देशमुख, जगदीश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते.या कार्यक्रमात हनुमान आळी ग्रामस्थांच्या वतीने खा.सुनील तटकरे यांचा जंगी सत्कार करण्यात आला.
यावेळी खा.सुनिल तटकरे यांनी खुप वर्षानंतर या ठिकाणी येण्याचा योग आला.ग्रामस्थांच्या आग्रहाखातर आलो,कार्यक्रम एक महिना अगोदरच ठरला होता.त्यामुळे कोण कुठे गेले,म्हणून या ठिकाणी आलो नाही. या ठिकाणी अनेक वर्षांनी आलो असलो तरी विकासाच्या द्दृष्टीने सातत्याने या विभागाचा विचार केला जात होता. पुर्वी या भागात पाणी समस्या गंभीर असताना विधानसभेत आवाज उठवून एमआयडीसीचे पाणी मिळवून दिले. व आज सुमारे २ कोटीची योजना मेढा ग्रा.पंचायतीमध्ये पुर्णत्वास आली आहे. याचेही लोकार्पण लवकरच होईल असे सांगताना विकासाचे बाबतीत आम्ही येथे कधीच कमी पडलो नाही, म्हणून तर आदितीला यामतदार संघात दहा हजार मते मिळाली. काल परवा कोण कुठे गेले म्हणून पक्ष कमी होत नाही. तर या ठिकाणी पक्ष हा वाढतच चालला आहे. ज्यांना रोहे तालुक्याचे सभापतीपद दिले, त्यांना निवडून आणण्यासाठी शेवटच्या दोन दिवसात काय केले हे व्यासपिठावर बसणारे साक्षीदार आहेत.या परिसराने सातत्याने त्यावेळी राजकीय ताकद दिली म्हणूनच महाराष्ट्र ते दिल्ली असा राजकीय प्रवास करू शकलो म्हणून मेढा हा विभाग माझ्या राजकारणाचा कणा आहे. असा कृतज्ञतापुर्वक उल्लेख त्यांनी आवर्जून केला.या भागातील जुन्या जाणत्या बुजूर्ग नेत्यांचा इतिहास सुनील तटकरे यांनी आमदार अनिकेत तटकरे यांना सांगितला.या विभागातील लोक फार निष्ठेने काम करतात. एखादे काम ग्रामस्थांनी ठरविले की,ठरविले.करायचे म्हणजे करायचे,हनुमान आळीच्या एकसंघपणातूनच हे मंदिर उभे राहिले असल्याचे तटकरे म्हणाले.भविष्यात मेढा विभागाला विकासाचे झुकते माप दिले जाईलच,परंतू यशवंतखार पट्ट्यात देखील विकासाचे बाबतीत जातीने लक्ष घालणार असून त्या पट्ट्याला मागे वळून पाहण्याची वेळ येणार नाही,असे शेवटी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक भगवान गोवर्धने यांनी केले.सुत्रसंचालन सौ.घोडिंदे यांनी तर परशुराम पवार यांनी आभार प्रदर्शन केले.
Comments
Post a Comment