खारगांव ग्रामपंचायत हद्दितील विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा संपन्न

पालकमंत्री आदितीताई तटकरे यांची विशेष उपस्थिती

विस्तारीत गावठाण भू-धारकांना ७/१२ वाटप, वन हक्क दावे प्रमाणपत्र वितरण

प्रदूषित झालेल्या नापीक भातशेती नुकसान भरपाईचे लाभार्थ्यांना चेक वाटपाचा कार्यक्रम संपन्न 

खारी/ रोहा-केशव म्हस्के

 महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.कु.आदिती तटकरे व अन्य मान्यवरांच्या हस्ते रोहा तालुक्यातील खारगांव ग्रामपंचायत हद्दितील खारी-काजुवाडी-गुरुनगर येथील विविध समाजोपयोगी कामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झाला. काजुवाडी येथील पाणी साठवण बंधाऱ्याचे लोकार्पण, काजुवाडी अंतर्गत डांबरीकरण साईड पट्टी गटार बांधणे, खारी गाव अंतर्गत रस्ता, गुरूनगर अंतर्गत रस्त्याचे डांबरीकरण,स्वयंभू श्री शिव शंकर मंदिर जीर्णोद्धार भूमिपूजन,व्यायाम शाळेचे भूमिपूजन आदी विविध समाजोपयोगी विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण त्याचवेळी काजुवाडी विस्तारीत गावठाण भू - धारकांना ७/१२ वाटप एम.आय.डी.सी. च्या पाण्याने प्रदूषित होऊन नापीक झालेल्या भातशेत  नुकसान भरपाई चे लाभार्थी शेतकऱ्यांना धनादेश वाटप, वनहक्क २१ दाव्यांचे प्रमाणपत्र वितरण सोहळा मोठ्या थाटामाटात, प्रसन्न व आल्हाददायी वातावरणामध्ये संपन्न झाले. 

या महत्त्वपूर्ण सोहोळयानिमित्ताने राज्यमंत्री तथा पालकमंत्री ना.अदिती तटकरे यांनी सांगितले की, रायगड लोकसभा सदस्य खासदार सुनील तटकरे,दमदार आमदार अनिकेत भाई तटकरे यांच्या सर्वोतोपरी सहकार्यातून खारगांव ग्राम पंचायत हद्दीतील दिवसेंदिवस वाढतच जाणारी लोकवस्ती त्यामुळे विविध मूलभूत नागरी सोयी सुविधा आदींचे उद्भवणारे वेगवेगळे प्रश्न जलदगतीने मार्गी लावण्यासाठी टप्पा - टप्प्याने प्रयत्न करून त्यांची सोडवणूक केली जाईल याची ग्वाही दिली.

    तर उपसरपंच नितीन मालुसरे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, कोकणचे भाग्यविधाते तथा रायगडचे खा.सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे व आ.अनिकेत तटकरे यांच्या माध्यमातून आपल्या ग्रामपंचायतीच्या विकासकामांसाठी नेहमीच झुकते माप मिळाल्याने  मोठ्या प्रमाणावर विकासकामे मार्गी लागल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच आपल्या ग्रामपंचायतीचा विकास करू शकतो हा सुज्ञ मतदारांचा ठाम विश्वास असल्याने मतदारांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पुनश्च सत्तेची संधी दिल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेसने ग्रा.पंचायतीवर आपले निर्विवादपणे वर्चस्व प्रस्थापित केले आणि जनतेची विश्वासहर्ता जपणुकीचे मोलाचे कार्य तटकरे परिवार सातत्याने करीत आहेत आणि यापुढेही कायम स्वरुपी करीत राहतील. कारण ज्याप्रमाणे वरसे ग्रामपंचायतीचे विस्तार वाढले असून त्याप्रमाणेच खारगांव ग्रामपंचायत ही अगोदरच सहा - सात वाड्या तीन - चार गावे आदींमुळे विस्तारित आहेच त्यामध्ये श्रीवर्धन - माणगाव - रोहा आणि रोहा - अलिबाग या दोन विधानसभा मतदार संघात विभागले आहे.

खारगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये देखील दिवसेंदिवस नागरिकरणात,लोकवस्तीमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने त्यानुसार मूलभूत व पायाभूत सोयी सुविधा आदी विविध समस्या आ वासून उभ्या राहतात. त्यांची योग्य प्रकारे व नियोजन पद्धतीने सर्व प्रश्न पक्षश्रेष्ठी माध्यमातून सोडविण्याचे यथोचित प्रयत्न केले जातील असे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील यांनी सांगितले.

    यावेळी ना.अदिती ताई तटकरे व मान्यवरांच्या हस्ते दैनिक नवराष्ट्र,नवभारत वृत्त समूहाच्या मार्फत आदर्श सरपंच पुरस्कार प्राप्त सरपंच सौ.सलोनी सतेज आपणकर यांचा सन्मान पूर्वक शाल, श्रीफळ,सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.

     याप्रसंगी राज्यमंत्री तथा रायगड जिल्हा पालकमंत्री ना.कु.अदिती तटकरे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, रोहा तालुका समन्वय व पुनर्विलोकन समिती अध्यक्ष विजय मोरे,तालुकाध्यक्ष विनोद भाऊ पाशिलकर, राजेंद्र पोकळे,सुधाकर वालेकर,वैभवी चोरगे,नायब तहसीलदार राजेश थोरे,सुरेश पाटील, वन संरक्षक पाटील,निलेश दहिंबेकर,आरे बुद्रुक सरपंच सौ. हिरा ताई ढुमणे,उपसरपंच महेश शिंदे, खारी गावचे अध्यक्ष दत्तात्रेय काळे,माजी सरपंच प्रफुल्ल वाळेकर,पांडुरंग मातेरे,विष्णू महागावकर आदी ग्रामस्थ व महिला मंडळ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वीतेसाठी सरपंच सलोनी आपणकर,उपसरपंच नितीन मालुसरे,ग्रामविकास अधिकारी दिलीप पाबरेकर, सतेज आपणकर, सदस्या श्रीमती उर्मिला खिरीट,सौ.आशा मातेरे, सौ.प्रियांका मेहेतर,कलावती ढुमणे, सदस्य उमेश सावंत, माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सविता श्याम एसपाटील, गुलाब मोतीराम कोळी,सदस्य मोरेश्वर गायकर,बबन वारगुडे,नरेंद्र पाटील, शैलेश खिरीट,अवधूत मातेरे,महेश कदम,आदींसह ग्राम पंचायत कर्मचारी वृंद, खारी- काजुवाडी गुरूनगर ,ग्रामस्थ महिला मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog