देवकान्हे गावचे प्रगतशील शेतकरी किसन वेटू सुटे यांचे निधन

रोहा-प्रतिनिधी

देवकान्हे ता.रोहा येथील प्रतिष्ठित नागरिक तथा विभागातील प्रगतशील शेतकरी किसन वेटू सुटे यांचे अल्पशा आजाराने शनिवार दिनांक २ एप्रिल २०२२ रोजी सकाळी ठिक ७ वाजता दुःखद निधन झाले.तरुण वयात त्यांच्या पुढे नोकरीचे पर्याय असताना सुध्दा समाजकार्याची व शेतीची आवड असल्यामुळे त्यांनी गावी राहून शेती करण्यास प्राधान्य दिले.स्पष्टोक्तेपणा व करारीबाणा त्यांनी अखेर पर्यंत जोपासला."आण्णा" ह्या नावाने ते परिसरात सुपरिचित होते.गाव व खांब विभागातील राजकीय,सामाजिक व शैक्षणिक जडणघडणीत त्यांचा मोलाचा वाटा होता.त्यांना कलेची व खेळाची आवड होती.

त्यांच्या अकाली निधनाने त्यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.त्यांच्या पश्चात पत्नी,मुलगे,मुलगी ,नातवंडे,भाऊ,पुतणे,पुतण्या असा मोठा परिवार आहे.त्यांच्या अंत्ययात्रेसाठी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मोठ्या प्रमाणात नागरिकांनी गर्दी केली होती.

त्यांच्या राख पुजवणीचा कार्यक्रम सोमवार दिनांक ४ एप्रिल रोजी सकाळी आठ वाजता होईल.त्यांचे दशपिंड सोमवार दिनांक ११ एप्रिल रोजी त्यांच्या राहत्या घरी होतील तर त्यांचे अंतिम कार्य,बारावे बुधवार दिनांक १३ एप्रिल २०२२ रोजी होतील.

 कै.किसन (आण्णां) सुटे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

Comments

Popular posts from this blog