आमदार भरतशेठ गोगावले यांच्या प्रयत्नांने भोराव ते सवाद धारवली निगडे रस्त्याच्या कामासाठी ८ कोटी रुपये मंजूर

पोलादपुर -आमिर तारलेकर

  महाड पोलादपुर माणगावचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या विशेष प्रयत्नाने भोराव ते सवाद धारवली निगडे रस्त्याच्या कामासाठी ८ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असुन, येत्या २ मे रोजी या रस्त्याच्या कामाचे टेंडर काढणार असुन लवकरच रस्त्याच्या कामाची सुरुवात केली जाणार असल्याचे महाड सार्वजनिक बांधकाम विभागाकडुन सांगण्यात आले आहे.


भोराव ते सवाद-धारवली रस्त्यावर खड्डे पडुन रस्त्याची बिकट अवस्था झाली असल्याने या विभागातील नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होते या विभागातील नागरिकांकडुन भोराव ते सवाद धारवली रस्त्याच्या नुतनिकरणाची मागणी आमदार भरतशेठ गोगावले यांच्या कडे करण्यात आली होती या मागणी ची आमदार भरतशेठ गोगावले यांनी दखल घेवून शासना कडे सततचा पाठपुरावा केला असल्यामुळे शासनाच्या बजेट मधून ८ कोटी रुपये निधी भोराव ते सवाद धारवली निगडे रस्त्याच्या कामासाठी मंजूर करुन घेतले आहे.Comments

Popular posts from this blog