"विकासकामांच्या पुर्ततेसाठी पश्चिम खोरा आपण दत्तक घेत आहोत"-आमदार अनिकेत तटकरे

आमदार अनिकेत तटकरे यांच्या हनुमान जयंती निमित्ताने पश्चिम खोऱ्यात सदिच्छा भेटी

रोहा-प्रतिनिधी

रोहा तालुक्यातील पश्चिम खोऱ्यात हनुमान जयंती उत्सव मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो.हनुमान जयंतीचे औचित्य साधून आमदार अनिकेत तटकरे यांनी विविध गावातील हनुमान मंदिरांना भेटी देऊन दर्शन घेतले.पश्चिम खोऱ्यातील यशवंतखार,करंजविरा,भातसई इ.गावांत आमदारांनी भेटी दिल्याबद्दल ग्रामस्थ व राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले व दर्शनास आल्याबद्दल आभार मानले.



  यशवंतखार येथे श्री भैरवनाथ उत्सवानिमित्ताने अनिकेत तटकरे आले असता ग्रामस्थांच्यावतीने त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. या कार्यक्रमात मनोगत व्यक्त करतांना त्यांनी श्री भैरवनाथ मंदिर सुशोभीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध करून देणार असल्याचे सांगितले. तसेच श्री अमृतेश्वर मंदिर सुशोभीकरण व जोड रस्त्याचे काम करण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे स्पष्ट केले.

 रोहा तालुक्याची कुस्ती पंढरी म्हणून ओळख असलेल्या यशवंत खार येथील पैलवानांना आधुनिक पद्धतीने कुस्त्यांचा सराव करता यावा, यासाठी कुस्ती मॅट उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले. 


यावेळी व्यासपीठावर रोहा तालुका राष्ट्रवादी ओबीसी सेल अध्यक्ष संतोष भोईर, सरपंच स्वप्नाली भोईर ,उपसरपंच अपर्णा दिवकर, ग्रामपंचायत सदस्य रवी ठाकूर, तुषार ठाकूर, संजय राणे, योगेश वाघमारे, गुलाब वाघमारे, गीता दिवकर, रूपाली ठाकूर, लता मढवी तसेच मुंबईकर मंडळ अध्यक्ष रामचंद्र म्हात्रे,मुंबईकर मंडळाचे सर्व पदाधिकारी, नंदकुमार म्हात्रे !राम ठाकूर, विलास दिवकर,काशिनाथ धुमाळ, विठोबा गुंड, नामदेव मढवी, पांडुरंग भोईर, जगन्नाथ ठाकूर, मधुकर कांबळे, तंटामुक्ती अध्यक्ष हरिभाऊ दिवकर, हरेश ठाकूर इत्यादी मान्यवर उपस्थित होते.


करंजवीरा येथे हनुमान जयंती निमित्ताने हनुमान मंदिरात आमदार अनिकेत तटकरे यांनी भेट दिली असता ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाने त्यांचे जल्लोषात स्वागत केले. यावेळी मनोगत व्यक्त करताना आमदार अनिकेत तटकरे यांनी सांगितले की, करंजविरा-दापोली जोड रस्ता तसेच जलजीवन मिशन योजनेअंतर्गत नळपाणी पुरवठा योजना लवकरात लवकर मंजूर करण्यासाठी आपले प्रयत्न सुरू आहेत. विकास कामांसाठी पश्चिम खोरा आपण दत्तक घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. करंजवीरा येथील कार्यक्रमासाठी आमदार अनिकेत तटकरे यांचे समवेत श्री. संतोष भोईर,नथुराम ठाकुर, पांडुरंग भोईर, विठोबा गुंड, बाळाराम मोरे, लक्ष्मण मोरे, रामचंद्र मोरे, गणेश निकम, बाळकृष्ण पाटील, मारुती पाटील, यशवंत म्हात्रे ,शामित दिवकर, योगेश वाघमारे, संजय राणे,करंजवीरा ग्रामस्थ व मुंबईकर मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


आमदार अनिकेत तटकरे यांच्या पश्चिम खोऱ्यातील भेटीगाठींमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.

Comments

Popular posts from this blog