अलिबागमध्ये माणुसकी वॉकेथॉन 2022 ला उत्स्फूर्त प्रतिसाद 

सेवाभावी संस्थेच्या कार्याचे सर्वत्र कौतुक

अलिबाग-प्रतिनिधी

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, महावीर जयंती, माझी वसुंधरा जन जलजागृती अभियान अंतर्गत व रायगड जिल्हा परिषद, नगरपालिका अलिबाग व माणुसकी प्रतिष्ठान जीतनगर महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने वॉकेथॉन 2022 चे आयोजन करण्यात आले होते. 

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे जयंतीचे औचित्य साधून आज दि.14 एप्रिल 2022 रोजी स. 6 ते 8.30 दरम्यान अलिबाग बीच येथून या वॉकेथॉनची सुरुवात झाली.यामध्ये झाडे लावा झाडे जगवा, झाडांचे संवर्धन करा, पाण्याचा वापर कमी करून पाणी वाचवणे, तसेच पावसाचे पाणी शक्य होईल तेवढे जमिनीत मुरवणे, प्लास्टिक मुक्तीचा संदेश , प्लास्टिक कचरा गोळा करत 5 किलोमीटर वोकेथॉन अतिशय उत्साही वातावरणात संपन्न झाले. या वेळी रायगड जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, अलिबाग नगरपालिका मुख्यधिकारी श्रीम.अंगाई साळुंखे, उपमूख्य कार्यकारी अधिकरी (ग्राप) श्री राजेंद्र भालेराव ,समाजकल्याण अधिकरी श्री लेंढि, पशुसवर्धन अधिकारी श्री कदम ,पंचायत समिती अलिबाग गट विकास अधिकारी श्री साळावकर,माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र अध्यक्ष डॉ.राजाराम हुलवान आदी मान्यवर उपस्थित होते.

या वेळी महावीर चौक येथे भगवान महावीर स्मारकाला अभिवादन करून पुढे डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून पुढे ग्रामपंचायत चेंढरे हद्दीतून पुढे बायपास रोड मार्गे नगरपालिका अलिबाग तिथून सरखेल कान्होजी आंग्रे स्मारकास अभिवादन करून पुढे छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करणेत आला. माणुसकी प्रतिष्ठान महाराष्ट्र सचिव विशाल आढाव यांनी गारद बोलून छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष केला ही वॉकेथॉन अलीबाग बीच येथे पोहचली. 

आयएमए  डॉक्टर्स, अम्मा डॉक्टर्स, आरएमए डॉक्टर्स , लायन्स क्लब ऑफ मांडवा, डायमंड क्लब, पोयनाड क्लब, अलिबाग क्लब, श्रीबाग क्लब, रोटरी क्लब ऑफ शिशोर अलिबाग, रोट्रॅक्ट क्लब अलिबाग, सह्याद्री प्रतिष्ठान, स्वातंत्र्याचे शिलेदार प्रतिष्ठान, गडवाट प्रतिष्ठान, सुरभी स्वयंसेवी संस्था, प्रिझम संस्था, स्वयंसिद्ध संस्था, नेहरू युवा केंद्र अलिबाग संस्थेचे प्रमुख , माथाडी कामगार संघटना, अलिबाग शिक्षक संघटना, अलिबाग पत्रकार संघटना व सामाजिक कार्य करणाऱ्या संस्था, स्वयंसेवक ,रायगडजिल्हा परिषद कर्मचारी,वरसोली ग्राम पंचायत ,चेंढरे ग्रामपंचायत व नगरपालिका अलिबाग चे स्वच्छता कर्मचारी,तसेच पुरस्कर्ते राकेश चव्हाण, अभिजित कारभारी, अमृत म्हात्रे, रोहन पाटील, चेतन राणे, प्रल्हाद म्हात्रे, कराटे प्रशिक्षक संतोष कवळे व टीम उपस्थित होते.

चेंढरे ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ प्रणिता प्रल्हाद म्हात्रे व अलिबाग नगर परिषद मार्फत सर्वांना पाण्याची व्यवस्था करण्यात आली.

मुख्यकार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील यांनी सर्व प्रथम भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर, भगवान महावीर याना अभिवादन करत ते म्हणाले की पाणी व स्वच्छता ही जनजागृती चळवळ झाली पाहिजे जीवनात स्वच्छतेचे अनन्यसाधारण महत्त्व आहे आरोग्यदायी सवयी सर्वांनी अंगिकारल्या पाहिजे असा संदेश दिला.डॉ. राजाराम हुलवान यांनी वॉकेथॉनला सर्वांनी उत्स्फूर्तपणे व मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिल्याने सर्वांचे मनापासून आभार मानले व यापुढे असे जनजागृतीचे कार्यक्रम घेण्यात येतील व त्यामध्ये सर्वांचा सहभाग असावा असे आवाहन केले.

राजिप समन्वयक जयवंत गायकवाड,माणुसकी कार्याध्यक्ष तानाजी आगलावे व संपूर्ण माणुसकी टीम ने वाहतुकीस अडथळा न आणता वॉकेथॉन  पूर्ण करण्यास मदत केली, संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माणुसकी प्रतिष्ठान अलिबागचे सचिव संदीप वारगे यांनी केले, आजच ऍड.भूषण जंजिरकर यांच्या अध्यक्षतेखाली माणुसकी प्रतिष्ठान अलिबाग शाखेची घोषणा करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog