माणसाने कितीही मोठा बंगला बांधला,तरी त्या बंगल्या समोर तुमची आई बसलेली दिसली पाहिजे....हिच खरी पुण्याई-हभप अनिल महाराज तुपे

पिंगळसई येथील किर्तन सोहळ्यात हभप अनिल महाराज तुपे यांचे मार्गदर्शन 

रोहा-शरद जाधव

माणसाने कितीही मोठा बंगला बांधला,तरी त्या बंगल्या समोर तुमची आई बसलेली दिसली पाहिजे हिच खरी तुमची पुण्याई असल्याचे मार्गदर्शन  ह.भ.प.अनिल महाराज तुपे (नाशिक) यांनी केले.

  पिंगळसई येथे युवा नेतृत्व अनंतराव देशमुख यांच्या मातोश्रींच्या, लिलाबाई अंकुशराव देशमुख यांच्या प्रथम पुण्यस्मरण सोहळ्या निमित्त किर्तन सेवेचे आयोजन केले होते.त्यामध्ये मातेची महती सांगणारे किर्तन महाराजांनी सादर केले.

              उपस्थित जनसमुदयाला प्रबोधन करताना अनिल महाराज यांनी आई वडिलांसारखे दैवत या जगात नाही ,म्हणून ते जीवंत असे पर्यन्त त्यांच्या डोळ्यात पाणी आणू नका,सार जग तुम्हांला एकवेळ नालायक म्हणेल पण, तुमची आई माझा राजाच म्हणेल. आई वडिलांना वेडे वाकडे बोलू नका.मरेपर्यन्त त्यांची सेवा करा.म्हातारपण आणि लहानपण सारखेच असते. वय झाले की बडबडतात सांभाळून घेतले पाहिजे. असे मौलीक विचार अनिल महाराज यांनी व्यक्त केले.

         ज्या काळात तीन तीन दिवस चुल पेटत नव्हती त्या काळात पाच लेकरांना सांंभाळणारी आई अणि मग आता पाच लेकरांना एक आई सांभाळता येत नाही हे या समाजाचे दुर्देव आहे.म्हणून त्याना टाकुन बोलू नका.ज्या कुटुंबाने आई वडिलांची सेवा केली त्याँना अठ्ठावीस युगे देवच भेटणार. म्हणून माय बापाचा थुंका हातात घ्या ,मरेपर्यन्त तुम्हाला समाजापुढे हात पसरण्याची वेळ येणार नाही असे महाराज म्हणाले,

               यावेळी महाराजांनी सध्याच्या परिस्थीतीवर खुप मार्मिक कीर्तन केले. विद्वान लोकाना संपत्ती दिली नाही आणि चांगल्या लोकाना आयुष्य दिले नाही .म्हणून माणसाने थोडे जगा.पण चांगले जगा.पुर्वी विहिरीतुन एक बादली घेतली की झाल, परंतु आता कितीही मेकअप करा चेहरा कुरुपच, देह हा कधी तरी जाणारच आहे .कारण सत्ता आपली नाही. ठरलेल्या वेळी ठरलेल्या व्यक्तीला जो नेतो त्याला काळ म्हणतात म्हणून सावधान काळ कोणाला सोडत नाही. माणसाल 40 वय वर्ष उलटली की देव असल्याची जाणिव होते म्हणून जीवनात दुःख नको असतील तर देवाला शरण जावे. कारण देवच आपल्याला विविध संकटातून तारु शकतो कारण भक्ताच्या घरी देव दास,नावाडी बनुन राहिला असल्याचे इतिहासात दाखले आहेत.

        जीवनात परमेश्वराची भक्ती करा अणि व्यसन,अतीझोप, परस्त्रीगमन,लोकांची निंदा,अणि विनाकारण भांडंण या पाच गोष्टी  सोडा. जीवनात काहिच कमी पडणार नाही असे यावेळी अनिल महाराज म्हणाले.

 पंचक्रोशीचे वारकरी मंडळ प्रमुख ह.भ.प. पुरुषोत्तम महाराज पाटील यांनी उत्तम  मार्गदर्शन केले

                     अनिल महाराज  तुपे यांच्या किर्तन सेवेला गायणाचार्यांनी साथ दिली होती.

 देशमुख परिवार,युवक मंडळ पिंगळसई यांनी कार्यक्रमाचे नियोजन अतिशय उत्तम केले होते.

Comments

Popular posts from this blog