शेणवई गावाचे सामाजिक कार्यकर्ते शंकर महाडिक यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ



   धाटाव-शशिकांत मोरे

       रोहा तालुक्यातील शेणवई गावचे सामाजिक कार्यकर्ते शंकर महाडिक यांचे अप्लशा आजाराने नुकतेच निधन झाले.त्यांच्या निधनाने सबंध महाडिक कुटुंबियांसह  पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.महाडिक यांच्या निधनाचे वृत्त समजताच असंख्य चाहत्यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी धाव घेतली. 

       अत्यंत प्रेमळ स्वभावाचे आणि  मनमिळावू वॄत्तीचे असलेले स्व.शंकर सखाराम महाडिक शांत,संयमी आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही सर्वपरिचित होते.त्यांना धार्मिक तसेच सामाजिक विषयांत विशेष आवड होती.मागील काही दिवस ते आजारी होते.त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी पत्नी, मुले,नातवंडे यांनी त्यांना वृध्दपणात यातना होऊ नयेत यासाठी नितांत सेवा करीत त्यांची काळजी घेतली.अखेर वयाच्या ७१ व्या वर्षी त्यांची प्राणज्योत मालवली.त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच शेणवई येथे त्यांच्या निवासस्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता.त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक,राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आप्तस्वकीयांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन महाडिक परिवाराचे सात्वंन केले.शेणवई येथील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

       त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी,२ मुलगे,१ मुलगी,सुना,जावई,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रियाविधी रविवार दी. १ मे तर अंतिम धार्मिक उत्तरकार्य विधी बुधवार दि.४ मे रोजी शेणवई येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत असे पंकज महाडिक व समीर महाडिक यांनी सांगितले.

Comments

Popular posts from this blog