रोह्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते प्रचंड आक्रमक 

खासदार शरद पवारांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा केला निषेध

रोहा-प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या घरावरील भ्याड हल्ल्याचा रोहा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने आंदोलन करुन जाहिर निषेध करण्यात आला.रोहा नगरपालिका चौकात दि.९ एप्रिल रोजी सकाळी १०-३० वाजता हे आंदोलन करण्यात आले.यावेळी हल्ल्याच्या निषेधार्थ घोषणा देण्यात आल्या.

दरम्यान S.T.कर्मचाऱ्यांना कोर्टाने दिलेल्या निर्णयाचे पालन करणे गरजेचे होते.मात्र गेले पाच महिने विविध लोकांच्या नादी लागून आंदोलन तथ्यहिन व दिशाहिन झालेले होते.अपुरे वेतन असतानाही हे कर्मचारी इतके दिवस कसे तग धरु शकले?ह्या आंदोलनासाठी कोणते तरी अज्ञात हात मदत करीत असल्याचा संशय यावेळी व्यक्त करण्यात आला.त्याच अज्ञात शक्तीला हे आंदोलन शांततेच्या मार्गाने जाऊ नये असे वाटत आहे.हा विषय सतत धगधगता ठेवण्याचा पाच माहिने प्रयत्न केला गेला.शरद पवारांच्या घरावरील हल्ला हा ह्याच नियोजनबध्द कटाचा भाग असल्याचे ह्यावेळी सांगण्यात आले.सरकारने सखोल चौकशी करुन ह्या कटात सहभागी असणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली.

STकर्मचाऱ्यांनी खेडोपाडी बस बंद असल्यामुळे होत असलेल्या अडचणींचा विचार करणे गरजेचे आहे.सरकारने बहूतेक मागण्या मान्य करुनही केवळ राजकीय पाठिंबा मिळवून संघटना राजकारण करीत आहेत.त्यांनी सावध होऊन स्वतःचे आणि प्रवाशांचे नुकसान टाळावे असा सल्ला काही मान्यवरांनी दिला.

खासदार शरद पवार हे देशाचे महत्त्वाचे नेते आहेत.राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात त्यांच्याबद्दल आदरभाव आहे.त्यांच्या वरचा हल्ला खपवून घेतला जाणार नाही असा गर्भित इशारा देण्यात आला.

आंदोलन प्रसंगी जिल्हा कार्याध्यक्ष मधुकर पाटील, जिल्हा सरचिटणीस सुरेश मगर, तालुकाध्यक्ष विनोद पाशिलकर,विजयराव मोरे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा प्रितम पाटील, शहर महिला आघाडी अध्यक्षा प्राजक्ता चव्हाण, युवती अध्यक्षा रविना मालुसरे, स्नेहा ताडकर, शिवराम शिंदे, अनंतराव देशमुख, महेश कोलाटकर, राजेंद्र जैन, रामचंद्र सकपाळ, सतीश भगत, रामचंद्र नाकती, घनश्याम कराळे, सुभाष राजे, मजीद पठाण, नितीन पिंपळे, अनिल भगत, संदीप चोरगे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog