पत्रकार राजेंद्र जाधव यांना पितृशोक
ह.भ.प.मारुती जाधव यांचे निधन
रोहा-प्रतिनिधी
रायगड जिल्ह्यातील सुपरिचित पत्रकार श्री.राजेंद्र जाधव यांच्या वडिलांचे निधन झाले आहे.रोहा तालुक्यातील निवी गावचे मारुती भिवा जाधव, वय-८६ वर्ष यांचे गुरुवार दिनांक ३१ मार्च २०२२ रोजी दुपारी ३ वाजता आकस्मिक निधन झाले.
मारुती भिवा जाधव हे वारकरी संप्रदायाचे पायिक होते. त्यांचा स्वभाव प्रेमळ आणि मनमिळावू होता. त्यांच्या जाण्याने समाजात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. कै.मारुती जाधव यांना कुटूंबात आणि समाजात मानसन्मान व आदर होता. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या जाधव यांनी आपल्या सहा मुलांचे सुयोग्य संगोपन केले. जीवाची पराकाष्ठा करत मोठे केले.
कै.मारुती जाधव यांच्या पश्चात दोन मुले, चार मुली, सुना, जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
त्यांचे दशक्रिया विधी शनिवार दिनांक ९ एप्रिल रोजी तर उत्तरकार्य मंगळवार दिनांक १२ एप्रिल २०२२ रोजी राहत्या घरी निवी येथे होणार आहेत.
Comments
Post a Comment