जेष्ठ नागरिक संघ रोहाच्या अध्यक्षपदी पांडूरंग सरफळे (रावसाहेब) यांची निवड
रोहा-शरद जाधव
रोहा तालुक्यातील जेष्ठ नागरीक संघाच्या अध्यक्षपदी पांडुरंग बाळोजी सरफळे (रावसाहेब) यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
जेष्ठ नागरिक सभागृह रोहा येथे सदर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी हि निवड करण्यात आली.सदर बैठकित अध्यक्ष पांडूरंग सरफळे उपाध्यक्षपदी शांताराम गायकवाड, चिटणीस सुरेश मोरे, खजिनदार प्रकाश पाटील यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी समितीवर सुधाकर वालेकर,मारुती राऊत,बाळाराम शेळके,नंदकुमार भादेकर, शैलेजा देसाई यांची देखील निवड करण्यात आली.
अध्यक्षपदावर निवड झालेले पांडूरंग सरफळे यांना सहकार क्षेत्राचा गाढा अभ्यास आहे. रोहा येथील जय भवानी पतसंस्थेच्या चेरमनपदी ते गेली 25 वर्ष कार्यरत आहेत,या पतसंस्थेच्या माध्यमातून आर्थिक दुर्बळ घटकांच्या आर्थिक अडचणी दुर करण्याचे समाजपयोगी काम ते करीत आहेत. शासकीय सेवेत अभियंता पदावर काम केले असल्यामुळे प्रशासनाचा अनुभव आहे.तसेच निवड झालेले सर्वच पदाधिकारी हे शासकिय व निमशासकिय सेवेत निवृत्त झालेले असल्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदा ही संघटनेला होणार आहे.
सध्या ऑनलाईनचे युग आहे. यामधे जेष्ठ नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. त्यांच्या समस्या सोडवून त्यांच्या जीवनात आनंद कसा निर्माण करता येईल? हे काम संघटना करणार आहे.
या संघटनेच्या कामाला अधिक गती व अनमोल असे मार्गदर्शन मिळण्याकरता उपसमिती गढित करण्यात आली आहे.यामधे शरद गुढेकर,मनोहर माळी,नारायण पाटिल,चंद्रकांत गावडे,चंद्रकांत गुंड. यांची निवड करण्यात आली.
तर शासकीय व निमशासकीय सेवानिवृत संघटना व जेष्ठ नागरिक संघटना या दोन्ही संघटनेनी सभासदाच्या हिताकरिता एकोप्याने काम करा असे अवाहन माजी अध्यक्ष मेंहदळे सर यांनी केले.
Comments
Post a Comment