रोठ खुर्द गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन
धाटाव-शशिकांत मोरे
रोहा तालुक्यातील रोठ खुर्द गावचे सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र महादेव मोरे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.त्यांच्या निधनाने मोरे कुटुंबियांसह सबंध पंचक्रोशीतील वातावरण शोकाकुल झाले आहे.मोरे यांच्या अंत्यदर्शनासाठी असंख्य चाहत्यांचा जनसमुदाय उपस्थित होता.
अत्यंत मनमिळावू, प्रेमळ स्वभावाचे आणी परोपकारी वॄत्तीचे असलेले स्व.हरिश्चंद्र महादेव मोरे शांत,संयमी आणि सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणूनही सर्वपरिचित होते.धार्मिक तसेच सामाजिक विषयांत त्यांना विशेष आवड होती.स्वतःचा टेम्पो व्यवसाय सांभाळून त्यांनी मुलांना शिक्षण देऊन त्यांच्यावर चांगले संस्कार केले.गेले काही दिवस ते आजारी होते.त्याचबरोबर त्यांच्या प्रकृतीला आराम मिळावा यासाठी पत्नी, मुले,नातवंडे यांनी त्यांना वृध्दपणात यातना होऊ नयेत यासाठी नितांत सेवा करीत त्यांची काळजी घेतली.शनिवारी रात्री वयाच्या ६२ व्या वर्षी अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच रोठखुर्द येथील वाघेश्र्वर नगर येथे त्यांच्या निवासस्थानी मोठा जनसमुदाय लोटला होता.त्यांच्या अंत्ययात्रेस सामाजिक,राजकीय क्षेत्रासह इतर क्षेत्रातील मान्यवर,नातेवाईक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.आप्तस्वकीयांनी त्यांच्या निवासस्थानी अंत्यदर्शन घेऊन मोरे परिवाराचे सात्वंन केले. तर राजकीय तसेच विविध सामाजिक क्षेत्रातिल मान्यवर मंडळी त्यांच्या अंत्ययात्रेत सहभागी झाले होते.रोठखुर्द येथिल स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.लिलाधर मोरे,सतीश भगत यांनी उपस्थितांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण केली.
त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी, मुलगे रूपेश,राकेश व संदेश ,सुन,नातवंडे असा मोठा परिवार आहे.त्यांचे दशक्रियाविधी व अंतिम धार्मिक उत्तरकार्य गुरूवार दि.२१ एप्रिल रोजी रोठखुर्द येथील वाघेश्वर नगर येथील त्यांच्या निवासस्थानी होणार आहेत.
Comments
Post a Comment