केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितिन गडकरी दिनांक ३ एप्रिलला ३ वाजता इंदापूर येथे येणार- खासदार सुनिल तटकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती
देशाचे आघाडीचे कार्यतत्पर, केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची आपण दिल्लीत भेट घेतली. रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्न त्यांना वेळोवेळी सांगितला. कोकणातील पर्जन्यमान व भौगोलिक परिस्थिती पाहता येथे रस्त्याचे काँक्रिटीकरण होणे गरजेचे आहे ही बाब आपण त्यांना समजावून सांगितली. अखेर त्याचे फलित मिळाले. पळस्पे ते इंदापूर महामार्गाचे काँक्रिटीकरणाचा शुभारंभ तसेच इंदापूर ते तळेमार्गे आगरदांडा मार्ग लोकार्पण, ताम्हाणे घाट मार्गे निजामपुर वरून माणगाव ते दिघी रस्ता लोकार्पण, अशा तिहेरी योग असलेल्या लोकार्पण व शुभारंभ कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी रविवारी तीन तारखेला इंदापूर येथे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार सुनील तटकरे यांनी दिली.
केंद्रीय बांधकाम मंत्री नितीन गडकरी येणार इंदापुर ते कासू रस्त्याच्या 400 कोटीच्या मंजूर कामाचे भुमीपूजन --- खासदार सुनिल तटकरे यांनी गीताबाग येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली माहिती.
मी मंत्री महोदयांकडे काही मागण्या केल्या, त्यांचे माझे पुर्वी पासूनचे मैत्रिपुर्ण संबंध यामुळे त्यांनी त्या मागण्या मान्य करित इंदापुर ते कासु या टप्प्या करिता 400 कोटी रुपये मंजूर केले त्याच कामाचा भूमिपूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होऊन रायगडवासियाना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी माहिती सुनिल तटकरे यानी दिली तर पुढील कासु ते पळस्पे टप्पा जवळपास 750 कोटींचा निधी या कामाकरिता खर्च होणार आहे. मला जनतेने खासदार म्हणून संसदेत पाठवले आहे व काम करण्याची संधी दिली आहे अणि त्या संधीचे सोने जनतेची कामे करुन करणार आहे. जिल्ह्यातील महत्वपूर्ण बाबींकडे शासनाचे लक्ष केंद्रीत करताना ताम्हाणी रस्ता, माणगाव ते दिघी रस्ता,माणगाव रस्ते कोंडी विषय ,खोपोली रस्ता,कशेडी, कर्जत मुरबाड रस्ता ,महाड,पोलादापूर रस्ता ,वडखळ अलिबाग,रेवस रेड्डी महामार्ग,अशा रायगडातील महत्वपुर्ण रस्त्याविषयी माहिती दिली तर कोकणातील रेल्वे द्वारा येथील कोकणवासीयांना अधिकची सेवा कशी मिळेल?या करिता रेल्वेचे प्रश्न देखील हाती घेत असल्याचे खासदार सुनिल तटकरें यानी संगितले .
नितीनजी गडकरी रायगडात येत आहेत त्यांचे माझे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्यामुळे ते निचितच रायगड साठी काही तरी घोषणा करतील असा विश्वास ही त्यानी व्यक्त केला.
सुनिल तटकरे खासदार झाल्यापासुन ज्या आत्मीयतेने कोकणचे प्रश्न संसदेत उपस्थित करित आहेत यावरुन कोकण वासियांच्या अपेक्षा तटकरे निश्चितपणे पुर्ण करतील असा विश्वास कोकण वासियांना वाटत आहे .
Comments
Post a Comment