किल्ला येथील कै.तुकाराम लोखंडे चषकाचा मानकरी ठरला गौळवाडी संघ 


रोहा-शरद जाधव

              रोहा तालुक्यातील किल्ला येथे कै.तुकाराम लोखंडे यांच्या स्मरणार्थ भव्य दिव्य  क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.

सदर चषकाचा मानकरी ठरला गौळवाडी संघ.संघास रोख रुपये  51000 व भव्य चषक उपस्थित  मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले.

रोहा तालुका शिवसेना माजी तालुका प्रमुख विष्णूभाई लोखंडे यांच्यावतीने त्यांच्या वडिलांच्या स्मरणार्थ क्रिकेट स्पर्धेचे अयोजन करण्यात आले होते. 

          सदर स्पर्धेत जवळपास 32 संघांनी भाग घेतला होता. किल्ला येथील भव्य मैदानात स्पर्धा भरविण्यात आल्या होत्या. सामने रोमहर्षक झाले.अनेक अटीतटीच्या लढती पहायला मिळाल्या.

          स्पर्धेत द्वितीय क्रमांक रु. 25000 व चषक सुदर्शन कंपनी, तृतीय क्रमांक रु. 15000 व चषक ,श्री गणेश खैरवाडी,चतुर्थ क्रमांक रु.15000 व चषक आंबेघर, संघास देण्यात आले. यामधे उत्कृष्ट गोलंदाज, फलंदाज, मालिकावीर यांना सन्मानित करण्यात आले.

   कोरोना काळात स्पर्धा झाल्या नाहीत ,परंतु यापुढे स्पर्धेला कधीही खंड पडू न देता अधिक आकर्षक स्पर्धा कशा होतील याचे नियोजन पुढील काळात करणार असल्याचे प्रनिल विष्णू लोखंडे यांनी संगितले.

मृत्युनंतर ही त्यांच्या स्मृती जीवंत राहाव्यात या करिता विष्णूभाई लोखंडे आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ काही ना काही उपक्रम हाती घेतच असतात. क्रिकेट स्पधेच्या माध्यमातून वडिलांच्या स्मृती जपण्याचे काम ते करित असुन भविष्यात ही ते काम चालू रहाणार असल्याचे विष्णू भाई लोखंडे यानी संगितले.

स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रनिल लोखंडे,शरद मुंढे,प्रसाद बामूगडे,कल्पेश घाग,तेजस दळवी ,अभिजीत अबाड , सुमीत दळवी,विवेक मोरे, नवतरुण मंडळ किल्ला यानी अथक मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog