पोलादपूर तालुक्यातील स्वरा हिंगोलीकर हिने पटकावला देशात चौदावा क्रमांक

पोलादपुर --ऋषाली पवार

 स्पर्धा परीक्षांची तयारी लहान वयापासून करावे तसेच पारंपरिक पाठांतर करून शिक्षण घेऊ नये यासाठी पहिली ते नववी या वर्गामध्ये वेगवेगळ्या शिष्यवृत्ती परीक्षा घेतल्या जातात. त्यातील सर्वात अवघड समजली जाणारी व राष्ट्रीय पातळीवर मूल्यांकन करण्यात येणारी परीक्षा म्हणजे बीडीएस ब्रेन डेव्हलपमेंट स्कॉलरशिप परीक्षा.

        पोलादपूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा येथील दुसरी मध्ये शिकणारी स्वरा विजय भिंगोलीकर  ही बीडीएस परीक्षेमध्ये रायगड जिल्ह्यात इंग्रजी माध्यमात प्रथम क्रमांक क्रमांक पटकावला आहे तसेच देशात गुणवत्ता यादीत 14 वा क्रमांक पटकावला आहे.

              स्वरा हिने यश संपादन केले आहे त्यासाठी तिच्या शाळेतील शिक्षकांची ही तिला मोठी मदत मिळाली होती शिक्षकांकडून तिच्या प्रत्येक शंकांचे निरसन केले जात होते तसे तिचा सराव करुन घेतला होता शाळेतील सर्व शिक्षकांनी तिला आपल्या परीने योग्य मार्गदर्शन केले.

                मुलांना बारावी नंतर होणाऱ्या सर्व स्पर्धापरीक्षांची तयारी लहान वयात सुरू करावीत असे त्यांचे शैक्षणिक व बौद्धिक स्तर उंचवावा मुलांची विचार करण्याची क्षमता यामध्ये वाढ व्हावी या उद्देशाने प्रत्येक शाळेमध्ये ही परीक्षा घेतली जाते.

Comments

Popular posts from this blog