श्री स्वामी समर्थ मठाचा भूमिपूजन सोहळा संपन्न .


तळा-किशोर पितळे 

             श्रीस्वामी समर्थ अध्यात्मिक विकास केंद्र अंबरनाथ संचलित उपकेंद्र राणेचीवाडी येथे श्री स्वामी समर्थ मठाचा भूमिपूजन समारंभ श्री आत्माराम चव्हाण यांच्या सपत्नीक करण्यात आले. शनिवार दिनांक ६ मे.रोजी सकाळी १० वाजता माननीय प्रमोद घोसाळकर जिल्हाप्रमुख शिवसेना यांच्या हस्ते पुजा व श्रीफळ वाढवून करण्यात आला. यावेळी प्रमुख मान्यवर प्रद्युम्न ठसाळ तालुका प्रमुख, शहर प्रमुख राकेश वडके,नगराध्यक्षा अस्मिता भोरावकर,उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे अॅड.चेतन चव्हाण,शरद सारगे, उपतालुका प्रमुख कोअर कमिटी सदस्य लिलाधर खातू माजी सरपंच नमित पांढरकामे भास्कर गोळे,माधुरी घोलप,सिराजखाचे,नरेश पोळेकर,मंगेश पोळेकर, कैलास पायगुडे,नगरसेवक, नगरसेविका जेष्ठ स्वामी सेवेकरी आबा मोरजकर,दामले काका (पुणे) श्री स्वामी सेवेकरी,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. श्रीस्वामी समर्थ मठासाठी महाड -पोलादपूरचे आमदार भरतशेठ गोगावले यांच्या आमदार निधीतून २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला असून त्याचे भूमिपूजन करण्यात आले.

              श्री स्वामी समर्थ मठ परमपूज्य गुरुवर्य वै.अण्णा मस्के यांच्या प्रेरणेतून मठ स्थापना करण्याचा निश्चय केला होता.त्यासाठी कै.बाळकृष्ण लक्ष्मण चव्हाण कुटुंबियांनी जागा दान केली असल्याने आज त्याचा भूमिपूजन होऊन लवकरच पूर्णत्वास जाईल याची खात्री प्रमोद घोसाळकर यांनी दिली. तालुक्याचा विकास करत असताना एकमेकांच्या प्रयत्नांतून सहकार्यातून विकास करायचा पाहिजे असे आवाहन जिल्हाप्रमुख यांनी केले. पाण्याची समस्या आहे ती लवकरच पूर्ण होणार असून अंतीम टप्प्यात असून भूमीपुजन लवकरच केला जाईल असा विश्वास यावेळी दिला.गेली कित्येक वर्ष मठाची प्रतिक्षा सेवेकरी करीत होते.आजच्या काळात जागा दान करून चव्हाण कुटुंबांनी मोठे योगदान दिले असून आमच्या माध्यमातून मदत केली जाईल.या मठाकडे येणारा रस्त्यासाठी निधी उपलब्ध करण्यासाठी, विद्यमान नगरपंचायतीच्या माध्यमातून किंवा इतर निधीतून उपलब्ध केला जाईल.तालुक्याच्या विकास कामात हातात हात घालून सहकार्याची भूमीका असेल असे उपनगराध्यक्ष चंद्रकांत रोडे यांनी सांगीतले.

Comments

Popular posts from this blog