बाहे येथे जागतिक ग्रामीण महिला किसान दिवस,जागतिक विद्यार्थी दिन तसेच जागतिक अन्न दिनानिमित्ताने विविध उपक्रम संपन्न
रोहा-प्रतिनिधी
दिनांक १५ ऑक्टोबर जागतिक ग्रामीण महिला किसान दिवस,जागतिक विद्यार्थी दिन तसेच १६ ऑक्टोबर जागतिक अन्न दिवस यांचे औचित्य साधून,कृषी विज्ञान केंद्र-किल्ला यांच्या सौजन्याने मौजे बाहे ता.रोहा येथे दि.१५ ऑक्टोबर २०२२ रोजी सकाळी ठिक ११ वाजता हनुमान मंदिर येथे कार्यक्रम आयोजित केले होते.
यावेळी कृषी विज्ञान केंद्राचे विशेष कार्यक्रम समन्वयक अधिकारी डाॅक्टर मनोज मांडवकर साहेब,डाॅक्टर संजय मांजरेकर साहेब,श्री.जिवन आरेकर सर,श्री.माधव गिते सर आवर्जून उपस्थित होते.तसेच बळीराजा शेतकरी सामाजिक संस्थेचे प्रमुख पदाधिकारी श्री.बामुगडे साहेब,के.व्ही.के.शास्त्रीय सल्लागार समन्वय समिती सदस्य सौ.रूपाली सचिन देवकर,तसेच एकता ग्राम संघाच्या crp सौ.प्रियांका गणेश पवार,व त्यांच्या समवेंत असलेल्या ग्रामसंघामधील सर्व महिला समूह बहुसंख्येने उपस्थित होत्या.तसेच याच गावांतील रा.जि.प.शाळेंतील विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री.गिते सर यांनी केले.व्यास मंचावरील प्रमुख मान्यवरांचे तसेच ग्रामसंघामधील सर्व महिला समूह यांचे विदार्थ्यानी बनविलेले पुष्पगुच्छ देऊन हार्दिक स्वागत करण्यांत आले.
उपस्थित मान्यवरांनी अन्न,वस्त्र,पाणी,नैसर्गिकरी तसेच शैक्षणिक या विषयावर मार्गदर्शन केले.
बचत गटातील शेतकरी महिलांनी तांदूळा पासून तांदूळाचे बनविलेले पाककलेचे पदार्थ,तसेच विद्यार्थ्यांनी ग्रामीण भागातील शेतातील कष्टकरी शेतकरी महिलीचे काबाडकष्ट या विषयावर सुंदर अशी बनविलेली रेखाचित्र.
या सर्वच विजेतांना कृषी विज्ञान केंद्र-किल्ला यांनी नारळ,सुपारीची कलमे व भेट वस्तू देऊन सन्मानित करणेंत आले.
शेवटी बाहे एकता ग्राम संघाच्या महिला प्रियांका पवार,रूपाली देवकर यांनी सर्वांचे आभार मानले.
Comments
Post a Comment