आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचा जल्लोष

शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांची सुतारवाडीतील गीताबागेत प्रचंड गर्दी

        कोलाड़ नाका-शरद जाधव

        कोकणचे युवा नेतृत्व, कोकण विधान परिषदेचे आमदार अनिकेत तटकरे या युवा नेतृत्वाच्या वाढदिवसाचा जल्लोष सुतारवाडीतील गीता बागेत मोठ्या जल्लोषात साजरा करण्यात आला. यावेळी  सामाजिक , राजकिय, शैक्षणिक क्षेत्रातील तसेच तळागाळातील कार्यकर्ते, यांनी अनिकेत तटकरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

                सकाळी नऊ वाजल्या पासुन गीता बाग गर्दीने फुलून गेली होती.त्या अगोदर त्यांच्या आई सौ.वरदाताई तटकरे, पत्नी वेदांती तटकरे, बहिण माजी मंत्री आदिती ताई तटकरे, खासदार सुनिल तटकरे व विशेष म्हणजे नव्वद वर्षाच्या आजी गीताबाई तटकरे या सर्व कुटुंबीयाँनी त्यांना," तुम जियो हजारो साल" अशा शुभेच्छा दिल्या.

             आमदार अनिकेत तटकरे यांनी सुनिल तटकरे युवा प्रतिष्ठान च्या माध्यमातून सामजिक कार्याला सुरवात केली. त्यानंतर ते राजकारणात आले. अनेकांना त्यावेळी वाटले असेल की राजकारणात अनिकेत तटकरे कितपत भरारी घेतील. मात्र ही शंका त्यांनी खोडून काढत नुसती भरारी नाही तर गरूड भरारी घेतली. बघता बघता संपुर्ण कोकणातील तरुण वर्गाच्या गळ्यातील ते ताईत बनले. आज ते कोकण चे आमदार आहेत.या माध्यमातुन ते कोकणातील विविध प्रश्न सभागृहात मांडून सोडवत आहेत. राजकिय बालकडू घरातूनच मिळत असल्याने आपल्या वडिलांच्या राजकिय मार्गदर्शनाचा लाभ होत आहे.हे सारे बळ त्यांना लोकांची सेवा करण्यास उपयोगी पडत आहे.

               राजकारणाबरोबरच प्रतिष्ठानच्या माध्यमातुन ते सामाजिक काम सुध्दा हाती घेत असल्याने ते वर्षाच्या बाराही महिने तळागाळातील लोकांसमवेत दिसतात. आज त्यांच्या वाढदिवशी ग्रामीण तसेच शहरी भागात लागलेले शुभेच्छा फ़लक अनिकेत भाई यांच्या कार्याची पावती देतात. वाढदिवसाच्या निमित्ताने विद्यार्थी व जेष्ठ नागरिक, गोरगरिब लोकांकरिता विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात आले. या सामाजिक कामाची व्याप्ती खुप मोठी आहे. आमदार अनिकेत तटकरे यांचा मित्र परिवार मनापासून प्रत्येक उपक्रमात सहभागी झालेला दिसून येत होता.

            " दरवर्षी 10 जुलै ला फ़ुलणारी गीताबाग आत्ता आमदार अनिकेत व अदिती तटकरे यांच्या वाढदिवसाला फुलते हा पुण्याईचा ठेवा आहे." असे मत जेष्ठ नेते नारायण धनवी यांनी पत्रकार यांना संगितले.

        राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार ,प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल, माजी मंत्री धनंजय मुंडे, आमदार शेखर निकम, शिंदे गटाचे आमदार भरतशेट गोगावले, आमदार निरंजन डावखरे, आदी मान्यवरानी फ़ोन वरुन शुभेच्छा दिल्या.

      त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा,तालुका पदाधिकारी,विविध सेलचे पदाधिकारी,जिल्हा परिषद सदस्य,पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य,महिला आघाडी,युवती काँग्रेस ,विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी आणि जिल्हाभरातुन मोठ्या संख्येने आलेल्या नागरिकांनी आपल्या लाडक्या नेत्याला वाढदिवसाचूया शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog