कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेची मासिक सभा व "कवितेचे चांदणे" हा कार्यक्रम संपन्न

रोहा-प्रतिनिधी

दि . ११/ ११/ २०२२ रोजी कोकण मराठी साहित्य परिषद रोहे शाखेची मासिक सभा व कोजागिरी पौर्णिमे निर्मित्त "कवितेचे चांदणे" हा कार्यक्रम श्री . सुधीर क्षीरसागर यांचे अष्टमी रोहा येथील निवासस्थानी घेण्यात आला . सदर  कार्यक्रमास रोहा शाखाध्यक्षा सौ संध्या दिवकर ,श्री सुखद राणे , श्री विजय दिवकर, नारायण पानवकर ,आरती धारप, अचला धारप, सुधीर क्षीरसागर , संजीव शेरमकर , शरद कदम , अजित पाशिलकर, नेहल प्रधान , अमिषा बारस्कर, स्वराज दिवकर इ . कवी कवयित्री उपस्थित होत्या . मागील सभेचा इतिवृत्तांत सचीव श्री विजय दिवकर यांनी वाचून दाखविला . तो सर्वानुमते मंजूर करण्यात आला . सभेपुढील विविध विषयांवर सभेत चर्चा करण्यात आली .

कोजागिरी पौर्णिमेनिमित्त उपस्थितांचे कविसंमेलन  "कवितेचे चांदणे" या कार्यक्रमात शारदाचं चांदण, ग्रामदैवत धावीर महाराज, निसर्ग, तुजला आठवतो का? शब्दफुले, चूल,विठ्ठला,चंद्र ,चांदण्या,शरदपौर्णिमा इ . अनेकविविध विषयांवर आधारीत कवितांच्या टिपूर चांदण्यात सर्व श्रोते न्हावून निघाले .  दि . ७ ऑक्टोबर कवी केशवसुत यांच्या जयंती निमित्त श्री सुखद राणे यांनी कवी केशवसुत यांच्याबद्दल माहिती सांगून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली . आभार श्री नारायण पानवकर यांनी मानले . सदर कार्यक्रमास श्री . संजय क्षीरसागर , सौ . सुजाता क्षीरसागर , श्री .सुधीर क्षीरसागर, सौ .सुप्रिया क्षीरसागर यांनी विशेष मेहनत घेतली .

Comments

Popular posts from this blog