ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे रक्तदान शिबिर संपन्न
रोहा-निखिल दाते
रविवार दिनांक 16 ऑक्टोबर 2022 रोजी ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या सहकार्याने श्री ओंकारेश्वर मंदिर येथे रक्तदान शिबिर संपन्न झाले ,यावेळी 65 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली.
रोह्यातील सुप्रसिद्ध स्त्री रोग चिकित्सक डॉ. रघुनाथ भट व जिल्हा रक्तसंक्रमण आधिकारी डॉ. दिपक गोसावी यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबिराचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी शिबिराचे चांगल्या पद्धतीने आयोजन केल्याबद्दल डॉ. रघुनाथ भट यांनी ब्राह्मण मंडळ रोहा कार्यकारणीचे विशेष कौतुक केले.
शिबिराचा समारोप रोह्यातील सुप्रसिद्ध डॉक्टर रोहित क्षीरसागर व डॉ. अपूर्वा क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना डॉ. अपूर्वा क्षीरसागर यांनी ब्राह्मण मंडळ रोहाच्या कमिटीतर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सदर रक्तदान शिबिराला रायगडच्या माजी पालकमंत्री श्रीवर्धनच्या आमदार आदिती तटकरे, रोह्याचे माजी नगराध्यक्ष समीर शेडगे, माजी नगरसेवक महेंद्र गुजर, महेंद्र दिवेकर, सुराज्य सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष रोशन चाफेकर,गुजराथी समाज अध्यक्ष विलास गुजर , रोहा अष्टमी मराठा समाज अध्यक्ष अमित उकडे ,धनगर समाजाचे पदाधिकारी हेमंत शेवाळे ,लायन्स क्लबचे अब्बास रोहावाला, मिलन शहा ,पराग फुकणे, नुरि रोहावाला रोटरी क्लबचे राकेश कागडा, आशिष शहा, राजीव शहा,केमिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष स्वप्नील धनावडे, मावळा प्रतिष्ठान अध्यक्ष राजेश काफरे, आदित्य कोंडाळकर आदींनी सदिच्छा भेट देऊन सक्रिय सहभाग नोंदवला.
शिबिर यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण मंडळ रोहा अध्यक्ष अमित आठवले ,सचिव निखिल दाते ,उपाध्यक्ष आनंद काळे ,खजिनदार चैतन्य आठवले ,कमिटी सदस्य सौ .नेहा आवळसकर ,सौ .विदुला परांजपे ,उदय गोखले ,सुमित रिसबुड, श्रीनिवास रिसबुड आदींसह सर्व ज्ञातीबांधवांनी अथक परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment