आमदार अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ८८ भारतीय आजी- माजी सैनिकांचा विशेष सन्मान
महेश बामुगडे आणि रूपेश बामुगडे यांचा स्तुत्य उपक्रम
खारी-रोहे-केशव म्हस्के
देशासाठी सर्वस्व समर्पण करणारे व अखंड देशसेवेचे व्रत अंगिकारून देशसेवा करणा-या आजी माजी भारतीय सैनिकांचा सन्मानाचा कार्यक्रम रोहे तालुक्यातील किल्ला गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा कार्यकर्ते महेश बामुगडे आणि रूपेश बामुगडे यांच्या सहयोगाने व तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जेष्ठ नेते व युवा कार्यकर्ते यांच्या सहकार्याने मोठ्या उत्साहात संपन्न करण्यात आला.
महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे विद्यमान आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून व खा.सुनील तटकरे यांच्या प्रेरणेतून,आ.आदिती तटकरे यांच्या संकल्पनेतून व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष मधुकर पाटील, प्रदेश सरचिटणीस विजय मोरे,तालुका अध्यक्ष विनोद पाशिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न करण्यात आलेल्या या सन्मान सोहळ्यातंर्गत रोहे शहर आणि परिसर तसेच नागोठणे,खांब,क़ोलाड,चणेरा,धाटाव,सुतारवाडी, पिंगळसई,आदी विभागातील भारतमातेचे शूरवीर आजी माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा यथोचित सन्मान करण्यात आला.राजकारणाबरोबरच समाजकार्यात नेहमीच सक्रीय असणारे महेश बामुगडे व रूपेश बामुगडे यांनी आ.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधूनभारतमातेचे शूरवीर आजी माजी सैनिक व त्यांच्या परिवाराचा घरोघरी जाऊन करण्यात आलेल्या सन्मानामुळे त्यांच्या या विधायक कार्याचे समाजातील सर्वच स्तरातून कौतुक होताना दिसत आहे.
Comments
Post a Comment