अवचितगड प्रतिष्ठानच्या वतीने कोरोना योद्ध्यांचा सन्मान
आमदार अनिकेत तटकरेंच्या वाढदिवसाचे औचित्य
रोहा-प्रतिनिधी
रोहा तालुक्यातील मेढे येथील अवचितगड प्रतिष्ठान हे सामाजिक, शैक्षणिक, कला,क्रीडा,सांस्कृतिक क्षेत्रात सेवाभावी वृत्तीने सतत उल्लेखनीय कार्य करत आहे.प्रतिष्ठान चे संस्थापक अध्यक्ष रायगड भूषण जेष्ठ पत्रकार उदय मोरे यांचे संकल्पनेतून विविध उपक्रम राबविण्यात येत असतात. याच धर्तीवर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था युवा कार्यसम्राट आमदार अनिकेत तटकरे यांचे वाढदिवसाच्या औचित्याने कोरोना,निसर्ग वादळ या काळात अविरत सेवा देणारे, सामाजिक कार्य करणाऱ्या १५ सेवाभावी व्यक्तिमत्वांचा सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती अध्यक्ष उदय मोरे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
मागील दोन वर्षे कोरोना,निसर्ग चक्रीवादळ, अतिवृष्टी या संकटांचा सामना आपण सर्वांनीच केला. अश्या संकटकाळी समाजातील विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या सेवाभावी व्यक्तीनी आपणही समाजाच काही देण लागतो ही भावना जोपासत आपत्ती ग्रस्तांची सेवा व गरजवंताला मदतीचा हात दिला. त्यामुळे यासर्व संकटांचा सामना करण्यात आपण सर्व यशस्वी ठरलो. अश्या या सर्व सेवाभावी व्यक्तिमत्वांचा सन्मान करावे व त्यापासून प्रेरणा घेत सामाजिक बांधिलकीची भावना युवा वर्गात जागृत रहावी यासाठी प्रतिष्ठान च्या वतीने हा सन्मान सोहळा आयोजित करणार आहे.यामध्ये तालुक्यातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या१५ मान्यवरांना सन्मानपत्र देत गौरवण्यात येणार आहे. यामध्ये रोहा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेस अध्यक्ष विनोदभाऊ पाशीलकर,सुप्रसिद्ध ऋदयरोग तज्ञ डॉ. अशोक जाधव,डॉ. भूषण सुहास खरीवले,मेढा ग्रामपंचायत सरपंच स्नेहा महेंद्र खैरे,वाली सरपंच उद्देश जनार्दन देवघरकर,सुमन नेत्रालय चे डॉ. देवेंद्र जाधव,पाटणसई सरपंच माधवी सदानंद गायकर,देवकान्हे सरपंच शाहीर वसंत भोईर,भुवन ता. माणगाव सरपंच दिक्षा दिपक जाधव,भिसे ग्रामपंचायत सरपंच सुप्रिया चंद्रकांत ठमके,जयभवानी पतसंस्था अध्यक्ष पांडुरंग बाळोजी सरफळे,कोकबन तलाठी विशाल तुकाराम चोरगे,सेवानिवृत्त विक्रीकर अधिकारी रघुनाथ रामचंद्र मोहिते,जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता के. वाय बारदेशकर, लाइफलाईन हॉस्पिटल पनवेलचे नथुराम नारायण सकपाळ या मान्यवरांना सन्मानित करण्यात येणार आहे.
Comments
Post a Comment