"शुद्धलेखनाच्या दिशेने" मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त रोह्यात कार्यशाळा संपन्न
रोहा प्रांताचे उपविभागीय दंडाधिकारी श्री ज्ञानेश्वर खुटवड, रोहा तहसीलदार सौ. कविता जाधव, पाली तहसीलदार श्री. उत्तम कुंभार कोमसाप रोहा शाखेच्या अध्यक्षा सौ. संध्या दिवकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री. सुखद राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत मुख्य व्याख्याते श्री. वैभव चाळके यांनी अतिशय उत्तम मार्गदर्शन केले.
मराठी व्याकरण आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज यातील चुका कशा टाळता येतात याचे अतिशय मार्मिक भाषेत गमतीशीर उदाहरणे देत वैभव चाळके यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपविभागीय दंडाधिकारी श्री. ज्ञानेश्वर खुटवड यांनी प्रशासकीय कामकाज करताना व्याकरणाच्या चुका टाळण्याचे आवाहन उपस्थित कर्मचारीवृंदास केले.
"शुद्ध लेखनाच्या दिशेने" या कार्यशाळेस सर्व विभागाच्या कर्मचाऱ्यांची उल्लेखनीय उपस्थिती होती, त्याच बरोबर कार्यशाळेस कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेचे विजय दिवकर, हनुमंत शिंदे, सुधीर क्षीरसागर, गणेश भगत आदी मान्यवर उपस्थित होते. रोहा तहसीलदार सौ. कविता जाधव यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी कोमसाप रोहा शाखा आणि उपविभागीय कार्यालयाचे श्री. प्रकाश म्हेत्रे यांची विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment