रोह्यात कुणबी एल्गार

 समाज परिवर्तनामध्ये " कुणबी जोडो अभियान" ठरणार मैलाचा दगड

गावो-गावी कुणबी युवकांच्या संघटनांचे जाळे अधिक बळकट करण्यावर भर

रोहा-प्रतिनिधी

समाजाच्या विविध प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी समाज संघटन व समाज जागृतीसाठी "कुणबी जोडो"अभियान अत्यंत प्रभावी ठरत असल्याचे दृष्टिपथात येत आहे.

कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी,तद्नंतर रायगडात "कुणबी जोडो" अभियानाला सुरूवात झाली.रायगड जिल्ह्यातील  पोलादपूर,महाड, माणगाव, तळा, म्हसळा पाठोपाठ आज दिनांक 13 जानेवारी रोजी हे वादळ रोह्यात धडकले.रोहा तालुक्यातील कोलाड -आंबेवाडी पासून समाजनेते स्व.माजी आमदार पा.रा. सानप कुणबी भवन रोहा पर्यंत अभुतपूर्व बाईक रॅली काढण्यात आली. रस्तात अनेक ठिकाणी ह्या रॕलीचे स्वागत करण्यात आले.

              यावेळी आयोजित सभेत,विचार मंचावर संघाचे अध्यक्ष भूषण बरे,हरिश्चंद्र पाटील,कार्याध्यक्ष कृष्णा कोबनाक,ज्ञानदेव पवार,सदानंद काष्ठे,अशोक करंजे, शंकरराव म्हसकर,सुरेश मगर,शिवराम शिंदे,रामचंद्र सपकाळ,मारुती खांडेकर,शिवराम महाबळे,शंकरराव भगत,रामचंद्र चितळकर, खेळू ढमाल,विष्णू लोखंडे,पांडुरंग सरफळे ,प्रो.माधव आग्री,डॉ सागर सानप,डॉ मंगेश सानप,दत्ताराम झोलगे,पोटफोडे,अनंत थिटे,महेश बामुगडे,सतीश भगत,अरविंद मगर,मुकेश भोकटे,सुहास खरीवले,सह मान्यवर व आदी मान्यवरांसह रोहा तालुक्यातील कुणबी समाज बांधव बहुसंख्येने उपस्थित होते.

  "कुणबी जोडो" अभियानात बोलतांना वालम यांनी समाजातील प्रभावी नेत्यांचा संदर्भ सांगितला.

 समाज नेते शामराव पेजे ,ग.स.कातकर,पा. रा.सानप,शांताराम भाऊ फिलसे इ.नेत्यांच्या काळात कोकणातील समाज संघटन अभेद्य होते.मात्र अलिकडे आपल्यातील हेव्यादाव्यांमुळे आपण मागे पडलो आहोत. त्यामुळे आपले असलेले हेवेदावे हे सारे बाजूला ठेऊन एक दिलाने  समाजाचे काम करू या, असे आवाहन कुणबी जोडो अभियानांतर्गत केले.

कुणबी जोडो अभियान, हे कोकणातील सात जिल्ह्यात संपन्न होत असून कुणबी समाजाच्या विकासासाठी तसेच भावी पिढीच्या उत्कर्षासाठी तसेच उन्नतीसाठी आपण एकत्रितपणे आले पाहिजे.  

रोहा तालुक्यात कुणबी जोडो अभियानाला कुणबी समाज मोठ्या प्रमाणात एकटवल्याचे रॅलीत पहावयास मिळाले. 

 कार्यक्रमाची सुरुवात कोलाड आंबेवाडी नाका येथून समाज नेते शामराव पेजे,कातकर,पा रा सानप यांना अभिवादन करून करण्यात आली.

 सुरेश मगर यांनी कार्यक्रमाचे प्रस्ताविक केले तर शंकरराव म्हसकर तसेच संघाचे अध्यक्ष भूषण बरे यांनी आपले विचार मांडले. 

 कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सतिश भगत यांनी केले तर आभारप्रदर्शन अनंत थिटे यांनी केले. 

 "कुणबी जोडो" अभियानामुळे रोहा तालूक्यातील कुणबी समाज संघटनेमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे.आत्मविश्वास व आत्मसन्मानाच्या जोरावर कुणबी युवावर्गाने,जेष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सुरू केलेल्या ह्या अभियानाने समाजात क्रांतिकारक बदल घडून येणार यात तिळमात्र शंका नाही.

Comments

Popular posts from this blog