रोहे दमखाडी क्रांतीज्योत मित्रमंडळ आयोजित रोहा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेस प्रारंभ  
साईबाबांच्या जयघोषाने रोहे नगरी दुमदुमली
खारी/रोहा-केशव म्हस्के
 रोहे शहरातील दमखाडी येथील अध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रांमध्ये अग्रेसर असलेल्या क्रांती ज्योत मित्र मंडळाच्यावतीने आयोजित श्री क्षेत्र संत गोरोबानगर दमखाडी ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेस परमश्रद्धेय आराध्य ग्रामदैवत श्री धावीर महाराजांच्या कृपाशिर्वादाने रोहा ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रेचे शुक्रवार दि.१३ जानेवारी रोजी प्रारंभ झाला. मोठ्या उत्साही व आनंददायी वातावरणामध्ये "साईनाथ महाराज की जय,"साईबाबांच्या जयघोषाने रोहे नगरी दुमदुमली.
           सालाबादप्रमाणे यावर्षी १७ वर्षांची लाभलेली परंपरा, अविरत व अखंडितपणे राखत दमखाडी येथून सकाळी ०९:०० वाजता साई भक्तांसमवेत परमश्रद्धेय रोहे नगरीचे आराध्य ग्रामदैवत श्री धावीर महाराजांचे दर्शन व कृपाशिर्वादाने श्री धाविर महाराज की जय,छत्रपती शिवाजी महाराज की जय,ओम साई राम,साईनाथ महाराज की जय,साईबाबा की जय,पायी हळू हळू चाला मुखाने साई साई बोला !तुला खांद्यावर घेईल! तुला पालखीत मिरविन साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन! साईबाबांच्या जयघोषाने संपूर्ण रोहे शहर दुमदुमले.
         रोहा दमखाडी ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे अष्टमी खारापटी मेढा,वाकण नाका मार्गे श्री क्षेत्र पाली - सुधागड  पांडुरंग मांडरे रासळवाडी यांच्या निवासस्थानी प्रथम दिनी भोजन व्यवस्था व वस्ती.शनिवार १४ रोजी परळी महेंद्र बारणेकर सकाळचे चहापान मध्यांन्हभोजन देवनाव्हे गणेशदादा नागे, रात्रौ वस्तीस्थान साई मंदिर सहकार नगर खोपोली, रविवार१५जाने.लोणावळा, वाकसई संत तुकाराम महाराज मठ,रात्रौ वस्ती कान्हा फाटा साईधाम, सोमवार१६  जाने.इंदोरी तळेगाव, सुदुंबरे दत्तमंदिर, रात्रौ.श्री गणेश मंदिर (संतोष नगर),मंगळवार १७ मामा मामी ज्ञानेश्वर बबन सांडवट, वाकेश्वर पेठ ( शंकर मंदिर),रात्रौ.वस्ती विलास शेट्ये ताराई निवास मंचर,बुधवार १८ सकाळी नारायण गाव,चिकू बाग,चालकवाडी गणराज मिसळ हॉटेल, रात्रौ वस्ती शंकर मंदिर काचेश्वर बोटा,गुरूवार १९ धारगाव,मध्यान्ह भोजन व्यवस्था श्री.काळभैरव मंदिर  डोळासणे , रात्रौ वस्तीस्थान चंदनापुरी गोपीनाथ राहाणे,शुक्रवार २० अकोले गणपती मंदिर,मध्यान्ह भोजन कौठे कमकेश्वर केशव वराडे, रात्रौ वस्तीस्थान साईनाथ मंदिर कोऱ्हाळे.शनिवार २१ जानेवारी रोजी श्री साईनाथ मंदिर कोऱ्हाळे मध्यान्न भोजन व्यवस्था नंदूर्खी राधा कृष्ण मंदिर तर रात्रौ. नंदूर्खी मार्गे श्री क्षेत्र शिर्डी मुक्कामी.
    रोहा दमखाडी ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा पालखी सोहळ्याचे साई भंडारा गुरूवार दि.२६जानेवारी२०२३ रोजी दमखाडी साई मंदिर येथे होणार आहे असे दिंडी व्यवस्थापन कमिटीच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे..
  सदरील रोहे ते श्री क्षेत्र शिर्डी पदयात्रा पालखी सोहळा यशस्वीतेसाठी व्यवस्थापक,सहव्यवस्थापक मंडळ, पदयात्रा कमिटी अध्यक्ष,उपाध्यक्ष, खजिनदार,आदी सदस्य व साईभक्त अथक परिश्रम घेत आहेत.

Comments

Popular posts from this blog