बोरीचामाळ येथे बिबट्याची दहशत; बिबट्याने पाडला बैलाचा फडशा

तळा-संजय रिकामे

तळा तालुक्यातील बोरीचामाळ येथे दिनांक २९ जानेवारी 2023रोजी शेतकरी गणपत गायकर यांच्या मालकीचा नांगरणीचा ७/८वर्षाचा बैल नेहमीप्रमाणे चरायला सोडला असताना घरी न आल्याने शोधा -शोध केली असता काल सकाळी  बिबट्यानी फस्त केल्याचे आढळून आले. यावेळी आजूबाजूला बघितले असता बिबट्याच्या पायाची ठसे आढळून आले. गावाजवळ हि घटना घडली असल्याने मोठी दहशत वाढली आहे त्यामुळे या बिबट्याने बैलाचा भक्ष्य केले असल्याचे आढळून आले वन्य प्राण्यांनी मोठा हैदोस मांडला असून अनेक गावातून उनाड ढोर यांच्या भक्ष्यस्थानी  होत आहेत या शेतकऱ्याचे जवळपास रुपये २५०००/- चे नुकसान झाले आहे.दिवसेंदिवस हिंस्त्र प्राणी यांचा उपद्रव झाला असून शेतकरी याला कंटाळलेआहेत तरी वनविभागाने याची त्वरित दखल घेऊन रितसर पंचनामा करून शेतकऱ्याचे नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी केली जात आहे.त्याचबरोबर या बिबट्याचा त्रास पन्हेळी(गायमुख) पासून ते कुडतुडी गावापर्यं तमोठ्या प्रमाणामध्ये होत असून  गावांमध्ये देखील अशाच ढोरा गुरांवर हल्ला होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे वन विभागाने या हिंस्त्र प्राण्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली जात आहे. बोरीचामाळ येथे बैलावर हल्ला करणारा बिबट्याच आहे याची पुष्टी अद्याप वन विभागाने दिलेली नाही. 

बिबट्याने हल्ला केल्यानंतर त्याची माहिती देण्यासाठी ग्रामस्थ तळा वन परिमंडळ अधिकारी यांच्या कार्यालयात गेले असता या कार्यालयास चालू दिवशी चक्क टाळे लावलेले होते,एकही अधिकारी कारकून या कार्यालयात हजर नव्हते त्यामुळे या कार्यालयात रुजू असणारे अधिकारी तालुक्यात काय करतात? हा चर्चेचा विषय असून शेतकऱ्याचे झालेले नुकसान कसे भरून निघणार असा प्रश्न सर्वांना पडला आहे.

Comments

Popular posts from this blog