रोहा तालुका गणित-विज्ञान अध्यापक मंडळ अध्यक्षपदी टिळक खाडे यांची सर्वानुमते नियुक्ती

रोहा-प्रतिनिधी

      शिक्षण क्षेत्रातील महत्वाचे व क्रियाशील समजल्या जाणा-या रोहा तालुका गणित विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष म्हणून वांगणी हायस्कूलचे उपक्रमशील शिक्षक टिळक खाडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली आहे.

     रोहा पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकारी मेघना धायगुडे यांच्या अध्यक्षतेखाली मेहेंदळे हायस्कूल येथे संपन्न झालेल्या गणित-विज्ञान अध्यापक मंडळाच्या सभेत त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

    यावेळी विस्तार अधिकारी रत्नाकर कनोजे व गट साधनव्यक्ती मनिषा पाटील , संगीता धामणसे व तालुक्यातील केंद्रप्रमुख व विविध शाळांतील मुख्याध्यापक उपस्थित होते.नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या कार्यकारिणीमध्ये उपाध्यक्ष म्हणून व्ही.बी.जाधव व ए. ए.रेडीज,सचिवपदी नितीन गोरीवले, सहसचिव विनय मार्गे व यतिन म्हात्रे, खजिनदार रमेश दडवे कार्यकारी सदस्य म्हणून शिल्पा मरवडे , सुमैय्या मुल्ला ,प्रदीप दिवकर , विजय वेळे , एस्. व्ही. जाधव, विनोद कुथे , रमजान उस्ताद , अर्चना साटम , शिवाजी मोटे , महेंद्र  जवरत , भाऊसाहेब चटाले , पी. टी . लोखंडे , सुनिल घोलप , गौतम सोलंकी यांची निवड करण्यात आली . तर स्वीकृत सदस्य म्हणून रा. जि. प. चे तंत्रस्नेही शिक्षक दिपक पाबरेकर यांची निवड करण्यात आली.यावेळी नवनिर्वाचित अध्यक्ष टिळक खाडे यांनी रोहा तालुक्यात विज्ञान प्रदर्शन ,विविध शिष्यवृत्ती परीक्षांची तयारी , गणित संबोध परीक्षा , शिक्षकांसाठी उद्बोधन वर्ग आदी शैक्षणिक उपक्रम राबविण्याचा मानस यावेळी व्यक्त केला.

     नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व कार्यकारिणी मंडळ व सदस्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog