वारकरी संप्रदायाचे निस्सिम अनुयायी ह.भ.प. शिवराम महाराज भोईर यांना देवाज्ञा
अध्यात्मिक व्यक्तीमत्वाच्या निधनाने परिसरात शोककळा
खांब/रोहा-नंदकुमार मरवडे
रोहा तालुक्यातील देवकान्हे गावचे रहिवासी तथा वारकरी संप्रदायाचे पाईक असणारे जेष्ठ वारकरी ह.भ.प.शिवराम धोंडू भोईर यांना शुक्रवार दिनांक ३१ डिसे.रोजी अल्पशा आजाराने मुंबई येथे एका इस्पितळात उपचारादरम्यान देवाज्ञा झाली.
ह.भ.प.शिवराम भोईर हे वारकरी संप्रदायाचे निस्सिम भक्त होते.तर देवकान्हे गावाचे सांप्रदायाचे जेष्ठ मार्गदर्शक होते.त्यांनी आपल्या आयुष्यात नियमितपणे आळंदी व पंढरपूरची वारी केली.शांत,संयमी व प्रेमळ स्वभावाचे शिवराम भोईर यांनी आपली हयात शेती क्षेत्रासाठी व वारकरी संप्रदायासाठी व्यथित केली.त्यांच्या दु:खद निधनाने देवकान्हे गावची सांप्रदायाचे क्षेत्रात फार मोठी हानी झाली असल्र्याची प्रतिक्रिया समाजमनातून व्यक्त होऊ लागली आहे.
ह.भ.प.शिवराम भोईर यांच्या दु:खद निधनाचे वृत्त समजताच समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी यांच्यासह वारकरी संप्रदायातील हरिभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.त्यांच्या पश्चात तीन मुलगे,एक मुलगी,नातवंडे,पतवंडे असा परिवार आहे.
त्यांचे दशक्रियाविधी सोमवार दिनांक ९ जाने.रोजी तर अंतिम धार्मिकविधी मंगळ दि.११ जाने.रोजी देवकान्हे येथील राहत्या निवासस्थानी होणार असल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांकडून देण्यात आली आहे.
Comments
Post a Comment