आदर्श युवा आमदार पुरस्काराने सन्मानित झाल्याबद्दल आमदार आदिती तटकरेंवर अभिनंदनाचा वर्षाव 

रोहा -प्रतिनिधी
श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाच्या आमदार तसेच रायगडच्या माजी पालकमंत्री आदिती तटकरेंचा जाधवर इन्स्टिट्यूट पुणे यांच्या वतीने झालेल्या सहाव्या युवा संवादात आदर्श युवा आमदार म्हणून सन्मान करण्यात आल्याने आ. आदिती तटकरे यांच्यावर रोह्यासह संपुर्ण रायगड जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहॆ. 

आ. आदिती तटकरे यांनी अल्पावधीतच महाराष्ट्राच्या विधानसभेतील युवा पिढीतील एक अभ्यासू व संवेदनशील लोकप्रतिनिधी म्हणून ओळख निर्माण केली असून आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटवला आहॆ. 
2019 मध्ये झालेल्या विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघातून भरघोस मतांनी निर्वाचित झाल्यानंतर आ. आदिती तटकरे यांना लगेचच राज्याच्या मंत्रिमंडळात आठ ते दहा खात्यांच्या राज्यमंत्री व रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली. 
कोव्हिड व निसर्ग चक्रीवादळासारखे मोठे संकट असतांनाही आव्हानात्मक परिस्थितीत उत्तम काम करत आदिती तटकरेंनी मिळालेल्या संधीचे सोने केले. 

आदर्श युवा आमदार पुरस्कार मिळाल्याबद्दल आ. आदिती तटकरेंचे सर्व स्तरातून विशेष कौतुक होत असून त्यांच्या कार्यकर्तृत्वात  खासदार सुनिल तटकरेंची छबी बघायला मिळत असल्याची प्रतिक्रिया जुन्या जाणत्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Comments

Popular posts from this blog