"परीक्षा पे चर्चा" उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेस रोह्यात विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
614 विद्यार्थ्यांनी घेतला चित्रकलेचा आनंद
रोहा- प्रतिनिधी
भाटे सार्वजनिक वाचनालय व पंचायत समिती शिक्षण विभाग रोहा यांच्या संयुक्त विद्यमाने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा व "परीक्षा पे चर्चा" पर्व-६ उपक्रमांतर्गत चित्रकला स्पर्धेचे रोह्यात आयोजन करण्यात आले होते.
बुधवार दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजी सकाळी ठिक ११ वाजता भाटे सार्वजनिक वाचनालय रोहा येथे चित्रकला स्पर्धेस मोठ्या उत्साहाने सुरुवात झाली.
विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या विविध विषयांवर विद्यार्थ्यांनी सुबक-सुंदर व कल्पक चित्रे रेखाटली.
चित्रकला स्पर्धेचे संपूर्ण नियोजन व व्यवस्थापन करण्यासाठी भाटे सार्वजनिक वाचनालयाचे अध्यक्ष श्री. किशोर तावडे तसेच श्री. महेश शशिकांत कुलकर्णी, सहकार्यवाहक यांनी मोलाची भूमिका बजावली.
भरघोस प्रतिसाद लाभलेल्या
चित्रकला स्पर्धेचा निकाल पुढीलप्रमाणे-
प्रथम क्रमांक- कुमारी बर्मा प्रिती. एम.बी.पाटील वरसे.
द्वितीय क्रमांक-कु.पाटील आदिती वि.ना.पंडित को.ए.सो.रोहा
तृतीय क्रमांक-कु.शेडगे वेदांत .जे.एम.राठी.रोठ
उत्तेजनार्थ -कु.धामणसे गौरव.एम.पी.एस.एस. स्कूल कोलाड
उत्तेजनार्थ-कु.चव्हाण तन्वी. वि.ना.पंडित को.ए.सो.रोहा
विजेत्या स्पर्धकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
तर सर्व सहभागी स्पर्धकांना प्रशस्तीपत्र देण्यात आले.
चित्रकला स्पर्धेतील बक्षिसपात्र चित्र
प्रथम क्रमांक-
द्वितीय क्रमांक-
तृतीय क्रमांक-
उत्तेजनार्थ-
Comments
Post a Comment