सुदर्शन सिएसआर फाऊंडेशनच्या सुधा सितारा शिष्यवृत्ती योजनेच्या ४६ विद्यार्थीनी ठरल्या लाभार्थी
माजी मंत्री आमदार अदिती तटकरे यांसह असंख्य मान्यवरांच्या उपस्थितीत सोहळा संपन्न 
धाटाव-शशिकांत मोरे
     पिगमेंट निर्मिती मधे भारतात प्रथम तर जगात तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या सुदर्शन केमिकल लिमिटेड या कारखान्यातील सुदर्शन सिएसआर फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थिनी करिता राबविण्यात येणाऱ्या सुधा सितारा या शिष्यवृत्ती योजनेतील सन २०२२-२३ वर्षाच्या रोह्यातील विविध विद्यालयाच्या ४६ गोर गरीब विद्यार्थीनींनी  लाभ मिळाला आहे.या लाभार्थी विद्यार्नीसह त्यांच्या कुटुंबीयांना हा मोठा आर्थिक आधार मिळाल्याने सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.
      आज शुक्रवार दि.१३ जाने रोजी सकाळी ११ वाजता रोठ्खुर्द येथील सुदर्शन कॉलनी हॉल मध्ये आयोजित शिष्यवृत्ती मागदर्शन शिबिरात चिंतामणराव देशमुख विद्यालय, द.ग.तटकरे विद्यालय,कोकण एज्युकेशन सोसायटी मेहंदळे हायस्कूल,कनिष्ठ विद्यालय व एम.बी.मोरे फाऊंडेशन विद्यालयतील एकूण ४६ विद्यार्थीनींना माजी मंत्री अदिती तटकरे यांच्या हस्ते शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.याप्रसंगी कंपनीचे साईट हेड विवेक गर्ग,प्लांट हेड सुबोध वैद्य,मार्गदर्शिका सौ.निधी गर्ग,सीएसआर प्रमुख माधुरी सणस,प्रमुख वक्ते किशोर काळोखे,सिएसआर विभाग वरिष्ठ अधिकारी रुपेश मारबते,महाडचे सुनील साळुंखे,चेतन चौधरी,गणेश भांभुरकर तर सुदर्शनचे पालकत्व  कर्मचारी विशाल घोरपडे,रविकांत दिघे महाविद्यालयातील प्राचार्य,सुदर्शनमधील अधिकारी वर्ग,पालकवर्ग,विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
       याप्रसंगी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात माजी मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या की,गेली कित्येक वर्ष सुरू असलेल्या महिला सबलीकरण,कचरा निर्मूलन यासारख्या विविध उपक्रमात सुदर्शन सीएसआर फाउंडेशन अग्रेसर असून त्यांचे काम कौतुकास्पद सुरू आहे.आता नव्याने सुरू केलेल्या सुधा सितारा शिष्यवृत्ती मधे कारखान्यातील अधिकारी वर्ग कामगार यांनी मोलाचा सहभाग दाखविल्याबद्दल कौतुक करून यापुढे एम.पी.एस.सी.व यू.पी.एस.सी साठी चांगल्या विद्यार्थिनी घडाव्या यासाठी मार्गदर्शन करावे आणि रोह्याचे नाव त्यांनी लौकिक करावे असे त्या म्हणाल्या.
   तर सुदर्शनचे साईट हेड विवेक गर्ग यांनी आपल्या पिगमेन्ट प्रोडक्टमुळे रोह्याचे नाव सुदर्शनमुळे जगात पोहचले असल्याचे सांगून कंपनीत आजवर ज्या ठिकाणी रासायनिक प्रक्रिया सुरू असते अशा ठिकाणी आम्ही २५० बी.एस सी.झालेल्या मुलींना नोकऱ्या दिल्या असल्याचे सांगत यापुढे कंपनीच्या सुरक्षेसाठी चांगले उपक्रम सुरू ठेवणार आहोत असे सांगितले.
    आपल्या प्रास्ताविकात सीएसआर प्रमुख माधुरी सणस यांनी फाउंडेशनच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवित असल्याची माहिती देत विभागातील गाव,शाळा,ग्रामपंचायत यांना आय.एस.ओ.नामांकन करण्याचा आमचा मानस असल्याचे सांगून आर्थिक चनचनीमुळे मुलींना शिक्षण अर्धवट सोडता येऊ नये म्हणून ही शिष्यवृत्ती योजनेची संकल्पना राबविली असल्याचे सांगितले.
     याठिकाणी विद्यार्थीनींसाठी करियर मार्गदर्शन आणि भविष्यासाठी वाटचाली संदर्भात प्रमुख वक्ते किशोर काळोखे यांनी मार्गदर्शन केले तर प्राचार्य अतुल साळुंखे यांनी महाविद्यालयासाठी रोल मॉडेल तयार करता येतील का? यावर लक्ष केंद्रित करावे अशी सूचना मांडून फाऊंडेशनचे काम कौतुकास्पद आणि अभिमानास्पद असल्याचे सांगितले.तर सुदर्शन मधील अधिकारी श्री.खोपकर यांनी देशाला पुढे न्यायचे असेल तर रिसर्च करायला हवे असे सांगून अशा कार्यक्रमांना आमची मोलाची साथ राहील असे सांगितले.याठिकाणी विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून सिद्धी पवार आणि पायल बाईत यांनी आपली मते मांडली.
    संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सिएसआर विभाग वरिष्ठ अधिकारी रुपेश मारबते तर महाडचे सुनील साळुंखे यांनी आभार व्यक्त केले.हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमित लांभेतवार,सौ गंगा पवार,वैशाली पवार यांसह सहकारी वर्गाने विशेष मेहनत घेतली.

Comments

Popular posts from this blog