स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त शंकरसुत यांच्या "मातृभूमी" प्रातिनिधिक काव्यसंग्रहाचे प्रकाशन 

रोहे-प्रतिनिधी

 दापोडे, ता. भिवंडी, जिल्हा ठाणे येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, कोकण प्रदेश अंतर्गत, राजापूर तालुका शाखेच्या वतीने आयोजित केलेल्या " बालगुणगौरव महोत्सव २०२२ "  या कार्यक्रमात संदिप तोडकर उर्फ शंकरसूत कोकण प्रदेश कार्याध्यक्ष यांनी संकलित/संपादित केलेल्या १०५ देशभक्तीपर काव्यरचनांचा  " मातृभूमी " या प्रातिनिधीक काव्यसंग्रहाचे प्रकाशन सुप्रसिद्ध कवी आणि कादंबरीकार डाॕ. अ. ना. रसनकुटे कोकण प्रदेश अध्यक्ष यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

        यावेळी शरद गोरे राष्ट्रीय अध्यक्ष, बाल गुणगौरव महोत्सवाच्या अध्यक्षा शुभांगी काळभोर राष्ट्रीय उपाध्यक्षा, डाॕ. अलका नाईक कोकण प्रदेश उपाध्यक्षा, सुरेश मेहता महाड तालुका अध्यक्ष व व्यासपीठावरील अन्य मान्यवरांच्या हस्ते मोठ्या उत्साही वातावरणात

काव्यसंग्रह प्रकाशन सोहळा संपन्न करण्यात आला.

या काव्यसंग्रहाला डाॕ. अ. ना. रसनकुटे यांची दर्जेदार प्रस्तावना लाभली आहे.

        सदरहू काव्यसंग्रहाच्या निर्मितीसाठी श्रध्दा पाटील, जगदीश म्हात्रे, प्रेमनाथ नाईक आणि दिनेश पाटील यांचे मोलाचे सहकार्य लाभले. या कार्यक्रमाला राजापूर तालुका शाखेच्या अध्यक्षा सुयोगा जठार, सरपंच व सदस्य यांच्या विशेष सहकार्याने आणि अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम भारदस्त झाला.

 शाळेतील मुलांचे मधूर समूहगीत, वैयक्तिक गीत, वकृत्व व सादरीकरण अप्रतिम व उपस्थितांची दाद मिळवून गेलं. या मुलांचे कौतुक करून त्यांना

मानचिन्ह व प्रशस्तीपत्र मान्यवरांच्या हस्ते देऊन गौरविण्यात आलं. अनेक मान्यवरांची मार्गदर्शनपर भाषणं झाली. मुख्याध्यापक व शिक्षकवृंद यांची मेहनत प्रशंसनीय ठरली.सदर बाल गुणगौरव महोत्सवाची संकल्पना तसेच मुख्य संयोजन मंडणगडचे सुप्रसिद्ध कवी संदिप शंकर तोडकर उर्फ शंकरसूत यांचे होती. त्यांच्या यापूर्वी मराठी भाषेची थोरवी गाणारा "माय मराठी"  प्रातिनिधिक काव्यसंग्रह  मंडणगड येथील "छत्रपती शिवाजी महाराज मराठी साहित्य संमेलनात प्रकाशित झाला असून "मातृभूमी"हा शंकरसुतांचा देशभक्ती पर काव्यरचनांचा दुसरा काव्यसंग्रह आहे.  अशा प्रकारे बाल गुणगौरव महोत्सव देशभक्तीपर गीतांनी अत्यंत भावनात्मक वातावरणात यशस्वीपणे संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog