स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्ताने रोहा लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम 

रोहा लायन्स क्लब च्या रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्त संकलित 

रोहा-प्रतिनिधी

    स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव व ऑगस्ट क्रांती दिनानिमित्त लायन्स क्लब रोहा च्या वतीने आयोजित रक्तदान शिबिरात ५० पिशव्या रक्त संकलित झाले.

शासकीय विश्रामगृहात झालेल्या या शिबिराला तहसीलदार कविता जाधव, नायब तहसीलदार राजेश थोरे, पंचायत समिती गटविकास अधिकारी श्रीमती पाटील, नगरसेवक महेंद्र गुजर, शिवसेना तालुका प्रमुख समीर शेडगे, संदीप सरफळे, महेश सरदार, रोटरी क्लबचे सुरेंद्र निंबाळकर, स्वप्नील धनावडे, सतीश महाडिक, विक्रम जैन, सृष्टी फाऊंडेशन चे सुखद राणे, समीधा अष्टीवकर आदींनी सदिच्छा भेट दिली.

हे शिबिर यशस्वीरित्या आयोजित करण्यासाठी जयदेव पवार व भावेश दामाणी यांच्या नेतृत्वाखाली झोन चेअरपर्सन नुरूद्दीन रोहावाला, अध्यक्ष अब्बास रोहावाला,उपाध्यक्ष सौ सुश्मिता शिट्याळकर, भाऊसाहेब माने, सेक्रेटरी डाॅ कृष्णा जरग, खजिनदार पराग फुकणे, संचालक प्रमोद जैन, सैफी रोहावाला, डाॅ तुषार राजपूत, अलेफिया रोहावाला, माया शहा, अनघा माने, जुमाना रोहावाला, बिना दामाणी, आदींनी विशेष परिश्रम घेतले. शासकीय रक्तपेढी अलिबाग यांच्या वतीने डाॅ दिपक गोसावी व त्यांच्या सहका-यांनी काम पाहिले.

Comments

Popular posts from this blog