कोकण मराठी साहित्य परिषद रोहा शाखेची मासिक सभा व कविसंमेलन उत्साहात संपन्न
रोहा-प्रतिनिधी
को.म.सा.प शाखा रोहाची मासिक सभा दि. ७ ऑगस्ट २०२२ रोजी श्रीयोग निवास येथे कोमसाप रोह्याच्या शाखाध्यक्षा सौ. संध्या विजय दिवकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली .यावेळी उपस्थित कवींनी उत्फुर्तपणे आपल्या काव्यरचना प्रस्तुत केल्या.
"थेंब टपोरे डूल डोलती हलती कानात ...लवलवणाऱ्या हरित तृणांचे कंकण हातात .... टपटपणाऱ्या पागोळ्यांचा नाद करी पैंजण .....सजून आली भुरभुरणारी अल्लड श्रावणसर"
या ओळी आहेत सौ . संध्या दिवकर यांच्या
मासिक सभेनंतर "आला श्रावण श्रावण" या विषयावर आधारीत कविसंमेलनात कवी हनुमंत शिंदे म्हणतात .
"रित्या ओंजळी केल्या पुरत्या रानात पावसाने ...अंकुरलेले शिवार माझे हिरवळीच्या रफाराने"
तर कवी नारायण पानवकर सरांनी अतिशय गोड आवाजात गेय कविता
"रातवा झुलू लागला"
"रिम झिम रिमझिम बरसत बरसत पाऊस पाऊसधारा"
अतिशय सुंदर कविता श्री.अजित पाशिलकर यांनी सादर केली.श्री. विजय दिवकर को.म.सा.प. सचिव यांनी "आला श्रावण श्रावण"या विषयावर लेख वाचून दाखवला तर श्री सुखद राणे कोमसाप जिल्हा प्रतिनिधी यांनी सुद्धा अतिशय सुंदर शब्दातील अनुभव समृद्ध लेख वाचून दाखवला .
"तुझ्या येण्याने पावसा झाल्या पल्लवीत आशा ......राबणाऱ्या हातावर आज हासल्या रे रेषा"
सौ. संध्या दिवकर यांच्या कवितेला सर्वांनी उत्स्फूर्त दाद दिली .
आभार प्रदर्शन श्री. नारायण पानवकर सर यांनी केले.
या सभेसाठी श्री.सुखद राणे,आरती धारप, विजय दिवकर,हनुमंत शिंदे,नारायण पानवकर , अजित पाशिलकर, स्वराज दिवकर इ.विशेष मेहनत घेतली असे को.म.सा.प. रोहा शाखा अध्यक्षा सौ. संध्या दिवकर यांनी सांगितले .
Comments
Post a Comment