रोह्यातील स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड कार्यक्रमास अभुतपुर्व प्रतिसाद
पोलीस,महसुल,शासकीय अधिकारी,शिक्षक,विद्यार्थी,सामाजिक संस्थासह रोहेकरांचा उत्फुर्त सहभाग
रोहा-प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 04 आॕगस्ट 2022 रोजी सकाळी 08.00 ते 10.30 वा.चे दरम्यान भारतीय स्वातंत्र्याला 75 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र-राज्य शासनाच्या सूचनेनुसार " हर घर तिरंगा " व "स्वातंत्र्याची अमृत महोत्सवी दौड" हा कार्यक्रम रोहा विभागातील कोलाड, नागोठणे, पाली व रोहा पोलीस ठाणे याचे सयुक्त विद्यमानाने पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग, अप्पर पोलीस अधिक्षक रायगड अलिबाग व उप विभागीय पोलीस अधिकारी रोहा विभाग रोहा यांचे नेतृत्वाखाली साजरा करण्यात आला.
सदर"अमृत महोत्सवी दौड" हि कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथून सुरु होऊन नवरत्न हाॕटेल-दमखाडी नाका- मेंहंदळे हायस्कुल-बाजार पेठ रोहा - तीन बत्ती नाका- रोहा एस.टी.स्टॅन्ड व पुन्हा कुंडलिका नदी संवर्धन गार्डन यामार्गे मार्गक्रमण केले. पोलीस बँड पथकाने राष्ट्रगीताचे गायन करुन सांगता करण्यात आली.
सदर कार्यक्रमा दरम्यान रोहा विभागातील १२ शाळेतील /कॉलेज मधील विद्यार्थी व शिक्षक वर्ग तसेच शासकीय अधिकारी/कर्मचारी,पोलीस पाटील,ग्राम रक्षक दल, सदस्य,पत्रकार,सामाजिक संस्था व इतर प्रतिष्ठीत नागरिक असे एकूण 1000 ते 1500 लोकांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमा दरम्यान तीन बत्ती नाका रोहा येथे विद्यार्थी वर्ग व साईराज डान्स अॕकॕडमी रोहा यांचे मार्फत देशभक्तीपर गीतांवर आधारित नृत्याचे सादरीकरण करण्यात आले.त्या नंतर कुंडलिका नदी संवर्धन गार्डन येथे पोलीस मुख्यालय अलिबाग येथील बँड पथकामार्फत राष्ट्रगीत गाऊन सदर कार्यक्रमाची शांततेत सांगता करण्यात आली.
👆👆👆 व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा
Comments
Post a Comment