"सोनगांव विभाग कुणबी समाज संघटनेत क्रांती घडविण्याची ताकद"-श्री.शंकरराव म्हसकर

मालसई येथे सोनगांव विभाग कुणबी समाजाच्या वतीने विद्यार्थी गुणगौरव सोहळा संपन्न

 रोहा-प्रतिनिधी

" ज्या वेळी सोनगांव विभागातील कुणबी समाज संघटित होऊन एखादे कार्य हाती घेतो त्यावेळी सामाजिक क्रांती निश्चितच घडते हा इतिहास आहे," असे प्रतिपादन जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते तथा कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर यांनी केले. मालसई येथे सोनगांव सलग्न ग्रुप कुणबी समाज  आयोजित विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रमात ते बोलत होते.कुणबी समाजाने एकत्र येऊन काम केले पाहिजे व संघटना बळकट केली पाहिजे यासाठी तरुणांनी अधिक योगदान द्यावे असे आवाहनही त्यांनी युवकांना केले.जातीच्या दाखल्यासाठीचा लढा व संघर्ष सुरुच ठेवण्याचे सुचोवात त्यांनी केले.

रोहा तालुका कुणबी समाजाचे अध्यक्ष शिवरामभाऊ शिंदे यांनी समाजाचा असणाऱ्या समस्या आम्ही वारंवार मंत्रिमंडळापर्यंत पोहोचत असल्याचे सांगितले. दहावी व बारावीचा मुलांनी उच्च शिक्षण घेऊन उच्च पदापर्यंत पोहोचले पाहिजे व आपल्या आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण केले पाहिजे.त्यासाठी कुणबी संघटना नेहमीच मदत करणार असल्याचे त्यांनी आपल्या मनोगतातून सांगितले. 

विभागीय अध्यक्ष श्री.खेळू ढमाल यांना समाजसंघटनेतील अनुभव कथन करताना अश्रू अनावर झाले.तालुका युवक अध्यक्ष श्री.अनंत थिटे यांनी विभागवार झालेल्या युवक संघटनेची माहिती दिली.संतोष खेरटकर, शंकर कदम यांनी आपल्या विभागातील सक्षम संघटनेबाबत व आगामी उपक्रमांविषयी मार्गदर्शन केले.

दक्षता समिती सदस्या तथा पत्रकार रविना मालुसरे-भोसले यांनी महिला-युवतींना समाजसंघटनेत सहभागी करण्याची मागणी केली.ज्या-ज्यावेळी समाजासाठी आंदोलन करण्याची वेळ येईल त्या-त्यावेळी महिला-युवती सर्वात पुढे उभ्या राहतील असे सुचक विधान त्यांनी केले.

श्री.अरुण आगळे सरांनी जातीचे दाखले व जातपडताळणी बाबतच्या त्रुटीं दुर करण्यासाठी अभ्यासपुर्ण मार्गदर्शन केले.

यावेळी सैन्यात कार्यरत असलेले मालसई गावचे सैनिक श्री. मिलिंद चाळके व श्री.संदेश आयरे यांच्या पालकांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात  आले.सोनगांव विभागातील कर्तृत्वसंपन्न व्यक्तीमत्वांचा सन्मान करण्यात आला.

 मनरेगा पुरस्कार प्राप्त श्री.नथुराम मालुसरे, दिव्यांग महाराष्ट्र कबड्डी संघामध्ये भाग कामगिरी बजावणाऱ्या कु.अक्षय निकम,कृषिनिष्ठ शेतकरी खरिवले इत्यादी समाजबांधवांना सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष शिवराम शिंदे, कुणबी उच्चाधिकार समितीचे माजी अध्यक्ष शंकरराव म्हसकर, तालुका सचिव दत्तात्रेय झोलगे, युवक अध्यक्ष अनंत थिटे, यशवंत हळदे,ग्रुप अध्यक्ष खेळू ढमाळ, सुनिल मोहिते,गजानन मालुसरे, चिंतामणी खांडेकर, महादेव सानप, शंकर शेलार, तुकाराम मगर, यशवंत मोंडे, चंद्रकांत शिंदे, शिवाजी मुटके, संतोष खेरटकर,शंकर कदम,अशोक कडव,धर्मा शेलार,भाऊ चाळके,हेमंत कडव,अनंत ढमाल,मारुती कदम, महेश तुपकर,सुशिल खांडेकर,दत्ता सानप,हेमंत कडव,मंगेश ढमाल,प्रकाश भोसले,हेमंत मालुसरे,योगेश शिंदे,शरद कदम,प्रभाकर दळवी,नथुराम मालुसरे,विनायक सावंत,शरद कदम,महादेव साळवी,चंद्रकांत कदम,नरेंद्र मालुसरे,कचरे निकेश कदम,दिनेश कडव,गणेश सानप आदी समाज बांधव उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विभागीय अध्यक्ष खेळू ढमाल, युवक अध्यक्ष सुनिल मोहिते व सोनगांव विभागातील सर्व कार्यकारणीने मेहनत घेतली.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. नंदकुमार मरवडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन युवक अध्यक्ष श्री.सुनिल मोहिते यांनी केले.


👆👆👆व्हिडिओ पाहण्यासाठी क्लिक करा.

Comments

Popular posts from this blog