वाली ग्रामपंचायतीचा स्तुत्य उपक्रम
स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवा निमित्ताने कर्तृत्ववान नागरिकांचा सन्मान
माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांची उपस्थिती
रोहा-प्रतिनिधी
दिनांक १५ ऑगस्ट २०२२ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ग्रामपंचायत वाली यांच्या वतीने विशेष नागरी सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.
वाली ग्रामपंचायतीच्यावतीने पोलीस, डॉक्टर,शेतकरी, व्यवसायिक, शिक्षक, पत्रकार, वकील, निवृत्त सरकारी कर्मचारी, विद्यार्थी, सरपंच, समाजसेवक, वारकरी संप्रदायातील व्यक्तिमत्व अशा समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.
त्याचप्रमाणे आदर्श गाव,कला, संस्कृती,व्यसनमुक्ती गाव अशा विविध प्रकारचे पुरस्कारांचे देखील वितरण माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांच्या हस्ते वितरण करण्यात आले.
यावेळी ग्रामपंचायत वाली अंतर्गत सर्व गावांतील नागरिकांनी,विशेषतः महिलांनी वैशिष्ट्यपूर्ण वेशभूषा केली होती. तसेच विविध कार्यक्रमांचे सादरीकरण करण्यात आले.
माजी पालकमंत्री आमदार आदितीताई तटकरे यांनी वाली ग्रामपंचायतीकडून आयोजित कार्यक्रमाचे कौतुक केले.
डॉक्टर-वकील यांसारखे आपल्या भागातील लोकांचा सत्कार करून लहान मुलांसमोर एक आदर्श ठेवला आहे डॉक्टर हृदयनाथ मनवे, वकील महेश घायले यांनी आपले गावापासून सुरू झालेले खडतर आयुष्य व ते या पदापर्यंतचा त्यांचा प्रवास,ग्रामपंचायतीचे व सरपंच ग्रामस्थांचे ह्या कार्यक्रमाच्या नियोजनाबाबत आभार मानले.
ग्रामपंचायतीचे सरपंच उद्देश देवघरकर,सदस्य,ग्रामस्थ यांचे आदिती तटकरे यांनी विशेष कौतुक केले.
या कार्यक्रमासाठी विशेष उपस्थिती माजी पालकमंत्री आमदार अदिती ताई तटकरे त्यांच्यासमवेत व्यासपीठावर डॉक्टर हृदयनाथ मनवे, वकील महेश घायले,राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष जयवंत मुंडे,रोहा टाईम्सचे मनोज घोसाळकर,महादेव दामूगडे संतोष पार्टे,नारायण पवार, किरण मोरे,हरेश नायणेकर,उदय शेलार,पत्रकार रविना मालुसरे-भोसले,स्वप्निल शिंदे, ग्रुप ग्रामपंचायत वाली मधील सर्व ग्रामस्थ, मुंबईकर मंडळ, महिला मंडळ,शाळेचे विद्यार्थी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment