गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रोहा पोलिसांचा रुट मार्च संपन्न
नागरिकांना सण-उत्सव शांततेत साजरे करता यावेत यासाठी पोलिस यंत्रणा दक्ष
रोहा-प्रतिनिधी
दिनांक 27/08/2022 रोजी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने कोणताहि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये या करिता रोहा पोलीस दक्ष झाले आहेत.
रोहा पोलिस ठाण्याचे हद्दीत मॉबड्रिल, दंगा काबू योजना व रूट मार्च चे प्रत्यक्षित घेण्यात आले. सदर वेळेस रोहा उपविभागा मधून 2 पोलीस निरीक्षक, 4 पोलीस उपनिरीक्षक, 2 आरसीपी प्लाटून व रोहा विभागातून एकूण 30 पोलीस अंमलदार हजर होते. सदरची मॉबड्रिल दंगा काबू योजना व रूट मार्च दुपारी 2.30 वाजता सुरू करून सायंकाळी 3.45 वाजता पूर्ण करण्यात आले.
Comments
Post a Comment