ग्रुप ग्राम पंचायत शेडसई तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी श्री.चंद्रकांत गायकर व उपाध्यक्षपदी श्री.ज्ञानेश्वर कोळी यांची निवड

रोहा-प्रतिनिधी

ग्रुप ग्रामपंचायत शेडसई येथे दिनांक 25/8/22 रोजी 3.30 वाजता ग्रामसभा घेण्यात आली.या ग्रामसभेमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.

 ग्रामसभेमध्ये तंटामुक्त कमिटीची स्थापना करण्यात आली. शेडसई तंटामुक्त कमिटीच्या अध्यक्षपदी शेडसई गावचे श्री.चंद्रकांत महादेव गायकर यांची बिनविरोध सर्व सहमतीने निवड करण्यात आली. तसेच श्री.ज्ञानेश्वर धर्माजी कोळी यांची तंटामुक्ती उपाअध्यक्ष पदी निवड करण्यात आली.

 तंटामुक्त गाव कमिटी नवनिर्वाचित अध्यक्ष व उपाअध्यक्ष यांना शेडसई ग्रामपंचायतीच्या उपसरपंच सौ. प्राजक्ता प्रभाकर कडू, सदस्या सौ.राजेश्री राजन पाटील, सौ. कल्याणी कृष्णा मढवी तसेच ग्रामस्थ राजन पाटील, कृष्णा मढवी, दिपक कडू, गोरख कडू,  प्रभाकर कडू, ज्ञानेश्वर कडू, राकेश संगम, निलेश कडू यांनी पुष्पगुछ देऊन सन्मानित केले.त्यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा देण्यात आल्या.

Comments

Popular posts from this blog