श्रीवर्धन मतदार संघामुळे मी खासदार आणि अदिती आमदार -खा.सुनिल तटकरे

जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी जनता दरबार सुरू ठेवणार-आ.अदिती तटकरे

तळा,म्हसळा,श्रीवर्धन तालुका मुंबई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा उत्साहात संपन्न

तळा -संजय रिकामे

श्रीवर्धन मतदार संघामुळे मी खासदार आणि अदिती आमदार झाली असल्याचे प्रतिपादन खा.सुनील तटकरे यांनी साहित्य संघ मंदिर गिरगाव येथे पार पडलेल्या

तळा, म्हसळा, श्रीवर्धन तालुका मुंबई कार्यकर्ता मेळाव्यात केले या मेळाव्यासाठी श्रीवर्धन मतदार संघाच्या आ.अदिती तटकरे,आ.अनिकेत तटकरे,राष्ट्रवादी काँग्रेस मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे,प्रदेश सरचिटणीस अली कौचाली, रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील,नझिम हसवारे,अॅड. उत्तम जाधव,हिराचंद तांबे या प्रमुख मान्यवरांसह पक्षाचे आजी माजी जिल्हा परिषद सदस्य, नगराध्यक्ष, नगरसेवक, पंचायत समिती सभापती, उपसभापती, सदस्य, तालुका अध्यक्ष, सचिव, विविध सेल अध्यक्ष,ग्रामीण व मुंबई पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

                    श्रीवर्धन मतदार संघातील तळा, म्हसळा, श्रीवर्धन या तालुक्यांतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा मेळावा आ.अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे घेण्यात आला.या मेळाव्यात कोविडच्या महासंकटात मुंबई सारख्या ठिकाणी चांगल्या प्रकारचे सामाजिक कार्य करणाऱ्या राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा खा. सुनिल तटकरे यांच्या शुभ हस्ते सन्मान चिन्ह शाल आणि पुष्पगुच्छ देऊन गौरव करण्यात आला. या मेळाव्यास संबोधित करताना खा.सुनील तटकरे पुढे म्हणाले की, माझ्या आधी काही वक्त्यांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला की यावेळी श्रीवर्धन मतदार संघातून १ लखांच्या फरकाने आ.अदिती तटकरे यांना निवडून आणणार तुम्ही सर्व जण या प्रकारे काम करत असणार असाल तर श्रीवर्धन मतदार संघातील जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गटातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार ७ ते ८ हजार मतांच्या फरकाने निवडून आले पाहिजेत.येणाऱ्या निवडणुका या करकर्त्यांच्या निवडणुका आहेत.माझा कार्यकर्ता निवडून येण्यासाठी त्याच्या मागे सुनील तटकरे आपली सर्वस्वी पणाची ताकद उभी करणार असल्याचे आश्वासन त्यांनी यावेळी दिले.

                 तटकरे पुढे म्हणाले की श्रीवर्धन मतदार संघातुन पूर्वी होत असलेली विकास कामे आणि आता होत असलेली सर्वांगीण विकासकामे सर्वधर्म समभाव,बंधुत्व जपत शहराबरोबरच गाववाड्यांचा विकास अधिक  गतिमान कसा होईल यासाठी पालकमंत्री म्हणून अदितीने केलेले काम कौतुकास्पद आहे.आता सत्ता परिवर्तन झाले असले तरी आम्ही राजकारणात शाहू,फुले,आंबेडकर यांचे विचार जपत सत्ता असो वा नसो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मध्यमातुन जनतेचा सर्वांगीण विकास करीत आहोत आणि भविष्यात करीत राहणार असे सांगताना शिवसेना एकच पक्ष आहे तो म्हणजे बाळासाहेबांचा दुसरा पक्ष मी मानत नाही सगळ्यांचे लक्ष उद्याच्या निकाला कडे लागले आहे निकाल काहीही असो श्रीवर्धन मतदार संघातील जनतेने मला अदिती आणि अनिकेतला संधी दिलीत म्हणून आघाडी सरकारच्या काळात मंत्री असताना व आता राज्यात सत्ता नसतनाही  कोटयावधी रुपयांची विकास कामे करीत आहे .भविष्यातही जनहिताची कामे केली जातील असे त्यांनी यावेळी सांगितले. 

                       माजी मुख्यमंत्री बॅ.अंतुले साहेबांच्या कार्याची आठवण काढून त्यांनी अनेक चांगले कार्यकर्ते घडविले असल्याचे सांगितले तर माजी केंद्रीय कृषीमंत्री तथा पक्षाचे राष्ट्रिय अध्यक्ष शरद पवार साहेबांच्या पुरोगामी विचारांमुळेच आज कित्येक महिलांना राजकारणात विविध पदांवर काम करण्याची संधी मिळत आहे याची माहिती सांगताना पवार साहेबांमुळेच दि.२५ मार्च २०१० ला श्रीवर्धनचा आमदार म्हणजेच आपण स्वतः सुनिल तटकरे अर्थमंत्री म्हणून राज्याचा सुवर्ण महोत्सवी अर्थसंकल्प मांडू शकलो असे सांगुन त्यांचे आभार मानले.२०१७ च्या जिल्हा परिषद निवडणुकित श्रीवर्धन मधे फक्त 2 जागांवर समाधान मानावे लागले तर म्हसळा व तळा तालुक्याने १००% निकाल दिला येणाऱ्या निवडणुकीत श्रीवर्धन मध्ये जि.प. व पंचायत समितीच्या सहाच्या सहा जागा निवडून आणण्या साठी आताच सज्ज व्हा असा सल्ला त्यांनी दिला.मी स्वतः कोणतीही मदत लागली तर ती करेन तुम्ही फक्त हाक मारा हा सुनिल तटकरे आणि संपुर्ण तटकरे कुटुंबिय तुमच्या सोबत असेल असे अभिवचन उपस्थिताना दिले. कार्यक्रमाचे आयोजन चांगले करण्यात आले आयोजकांचे त्यांनी आभार मानले.

            जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी जनता दरबार सुरू ठेवणार असल्याचे आ.अदिती तटकरे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले पालकमंत्री असताना पक्षाच्या धेय्य धोरणा नुसार जनता दरबार घेऊन समस्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मंत्री असताना सुरू केलेला जनता दरबार आता आमदार असले तरी सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी सांगितले.श्रीवर्धन मतदार संघातील जनतेने नेहमीच सहकार्य केले म्हणून कोणाच्याही ध्यानीमनी नसताना २०१९ ला मंत्री झाले. ८ विविध खात्यांसह जनतेची सेवा करण्याची संधी मिळाली या पुढेही सत्ता नसली तरी खा.तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली जनसेवा सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितले त्याचप्रमाणे मुंबई येथे महिलांचे संघटन तयार करून विविध कार्यक्रम राबविण्याचा संकल्प त्यांनी यावेळी केला.यावेळी आ.अनिकेत तटकरे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष दाजी विचारे,  रायगड जिल्हा अध्यक्ष मधुकर पाटील अॅड.उत्तम जाधव या प्रमुख मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुंबई अध्यक्ष महेश शिर्के,स्वागत व आभार आ.अनिकेत तटकरे यांनी मानले.

जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक जिंकायची आहे ही कार्यकर्त्यांची निवडणूक आहे ताकदीने लढणार खा.सुनील तटकरे यांनी आगामी निवडणुकांचे रणशिंग फुंकले,समविचारी पक्षाला सोबत घेणार असल्याची केली घोषणा.

Comments

Popular posts from this blog