रोह्यात स्वर्गीय विनायकराव मेटे यांच्या शोकसभेचे आयोजन
रायगड जिल्ह्यातील असंख्य चाहत्यांची उपस्थिती
अनेकांना अश्रू अनावर
रोहा-प्रतिनिधी
बहुजन समाज यांसह अखंड मराठा समाजाच्या हितासाठी अविरत झटणारे, सकल मराठा आरक्षणाचे खंदे पुरस्कर्ते, शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायकराव मेटे यांचे रविवारी १४ ऑगस्ट रोजी अपघाती निधन झाले.त्यांना आदरांजली वाहण्यासाठी रोह्यात सकल मराठा रोहा तालुका यांच्या वतीने रविवार दिनांक २१ आॕगस्ट २०२२ रोजी सकाळी ११ वाजता जेष्ठ नागरिक सभागृहात शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते.समुद्रामधे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिवस्मारक व्हावे ही भावना जोपासून मराठा समाजाच्या आरक्षणासाठी झटणारा लोकनेता हरवल्याने आयोजित शोकसभेत असंख्य चाहत्यांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.
सुरुवातीला रोहा तालुका सकल मराठा समाजाचे अध्यक्ष प्रदीप(आप्पा) देशमुख यांनी स्व.मेटे साहेबांच्या संपर्कात आल्यानंतरच्या आठवणींनी जाग्या केल्या.शिवसग्रामचे जिल्ह्याध्यक्ष अविनाश सावंत यांनी समाजाचे आरक्षण व शिवाजी महाराजांचे शिवस्मारकाचे मेटे साहेबांचे स्वप्न आपण साकार करूया असे सांगितले.
त्यानंतर चिंतामणराव देशमुख महाविद्यालयाचे प्रा.साळुंखे सर,उस्नानभाई रोहेकर,शिवसेनेचे रोहा तालुका प्रमुख समीर शेडगे,सूर्यकांत मोरे यांनी त्यांच्या प्रती असलेले प्रेम व्यक्त केले.मराठी पत्रकार परिषदेचे कोकण विभागीय सचिव मिलिंद अष्ठीवकर यांनी आम्ही ज्या क्षेत्रात काम करीत आहोत त्या दरम्यान त्यांच्या पत्रकरांप्रती असलेले वृणानुबंध व्यक्त करीत आता मेटे साहेब नसल्याने आम्हा सर्वांना हळहळ लागली असल्याची भावना व्यक्त केली.तर शिवसंग्रामचे जिल्हा सरचिटणीस अनंता देशमुख यांनी माझ्यावर निस्सीम प्रेम करणारा निस्सीम,विशुद्ध मनाच्या नायकाला मुकलो म्हणताच त्यांचे अश्रू ढळले.यानंतर पत्रकार राजेंद्र जाधव,भारतीय जनता युवा मोर्चा जिल्ह्याध्यक्ष अमित घाग,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्राजक्ता चौहान,मयुरा मोरे,नगरसेवक मयूर दिवेकर,अमित उकडे, मराठा महासंघाचे सुधागड तालुकाध्यक्ष गणेश देशमुख यांनी मेटे साहेबांप्रती प्रेम,भावना व्यक्त केल्या.व्यासपीठावरून व्यक्त होत असलेल्या भावना पाहून उपस्थितांच्या डोळ्याच्या कडा हळूहळू ओल्या होत गेल्या आणि सभागृहात अनेकांना मात्र अश्रू अनावर झाल्याचे पहावयास मिळाले.
याठिकाणी दिवंगत विनायकराव मेटे यांच्या जीवनपटावरील चित्रफीत प्रोजेक्टर वर दाखविण्यात आली.तर जिल्हाभरातून आलेल्या चाहत्यांच्या उपस्थितीत मेटे साहेबांना भावपुर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.याठिकाणी रांगेमध्ये शांततेत सर्वांनी मेटे साहेबांच्या प्रतिमेला अभिवादन केले.
दरम्यान शोकसभेला विजयराव मोरे,विनोद पाशिलकर,रोहिदास पाशिलकर,महेंद्र गुजर,राजू जैन,नितीन परब,रत्नप्रभा काफरे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती अध्यक्षा रविना मालुसरे-भोसले, मराठा महांघाच्या मंजुषाताई परब,रंजना खुमन,शमा पवार,प्रवीण पवार,अर्जुन सावंत,रामचंद्र भिलारे, पेण तालुकाध्यक्ष रूपेश कदम,काशिनाथ लांबे,विजय मगर,नितीन चौहान,सुनील सत्वे,विष्णू कदम,आण्णा निंबरे,प्रकाश चांदीवडे,डॉ.देशमुख,शिंदे सर,रवी चाळके,उत्तम नाईक,महेश सरदार,राजेश काफरे,प्रशांत देशमुख,निलेश शिर्के यांसह जिल्ह्यातून विविध समाजाचे नेते,लोकप्रतिनिधी,कार्यकर्ते,पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.या शोकसभेचे सूत्रसंचालन सुहास येरूणकर यांनी केले
Comments
Post a Comment