अंशुल कंपनीच्या वतीने स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव उत्साहात साजरा

रोहा-प्रतिनिधी

 भारतीय स्वातंत्र्याला १५ ऑगस्ट २०२२ रोजी  ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्षानिमित्त रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशाल्टि मोलेक्युक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या वतीने उपाध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करून साजरा करण्यात आले.

     भारतीय अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधत सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रांमध्ये हातभार लावण्यात अग्रगण्य असणाऱ्या धाटाव औद्योगिक वसाहतीमधील अंशुल स्पेशाल्टि मोलेक्युक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या माध्यमातून स्वातंत्र्य सैनिकांनी दिलेल्या बलिदानाप्रती कृतज्ञता व्यक्त करून त्यांना मानवंदना देण्यात आली. स्वातंत्र्यदिनानिमित्त प्रत्येक भारतीयांच्या मनामध्ये देशप्रेम,देशभक्ती,राष्ट्रभक्ती,जागृत व्हावी या उद्देशाने देशभक्तीपर गीते व भाषणे सादर करून विविध कार्यक्रम राबविण्यात आले.

     यावेळी वरिष्ठ सी. ई.ओ.शिरीष सातपुते यांच्या मार्गदर्शनाने वरिष्ठ उपाध्यक्ष एम.मुर्तुझा,उपाध्यक्ष लक्ष्मण शिट्यालकर यांच्या अध्यक्षतेखाली,पर्सनल मॅनेजर किशोर तावडे,मनोज खाडे, रोठ बुद्रुक ग्राम पंचायत सरपंच नितीन वारंगे, माजी सरपंच ज्ञानेश्वर साळुंके, माजी उपसरपंच रमेश मोरे, रायगड जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष तथा ग्राम पंचायत सदस्य अमित घाग,कामगार प्रतिनिधी शेखर टक्के,अनिल सानप,चंद्रकांत थिटे,मकरंद गोविलकर,शशिकांत साळुंके,निरंजन वारंगे,रुपेश साळुंके उपस्थित होते.

         कार्यक्रम यशस्वीतेसाठी पर्सनल मॅनेजर किशोर तावडे,आदी कामगार प्रतिनिधी,कामगार वर्ग व  महिला सभासदांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog