मानसी चापेकर यांच्या कविता संग्रहाचा शानदार प्रकाशन सोहळा संपन्न


रोहा-निखिल दाते
 रोहा येथील प्रतिभासंपन्न कवयित्री मानसी चेतन चापेकर ह्यांच्या 'हळुवार मनाची शाई' ह्या कवितासंग्रहाचे रविवार दिनांक 23 एप्रिल 2023 रोजी डोंबिवली येथे वक्रतुंड हॉलमध्ये पुस्तक प्रकाशन झाले. सदर सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून प्राध्यापक अशोक बागवे ,श्रीयुत प्रसाद कुलकर्णी हे उपस्थित होते तर प्रकाशक संजय शिंदे आणि कवी जनार्दन म्हात्रे ह्यांची सुद्धा सोहळ्याला उपस्थिती होती.

        अतिशय संवेदनशील आणि हळव्या मनाची असलेली ही कवयित्री निसर्ग प्रेम आणि अनेक नातेसंबंध यावरती उत्तम लिखाण करते मानसी चापेकर यांचा मला हेवा वाटतो असे गौरवोद्गार प्रा. अशोक बागवे यांनी सौ. मानसी चापेकर यांच्याबद्दल बोलतांना काढले. 

              प्रसाद कुलकर्णी यांनी मानसी चापेकर हिला 'कस्तुरी मृग' असे म्हणून तिच्यापाशी उत्तम अभिव्यक्ती आहे तिने उत्तरोत्तर उत्तम लिखाण करावे व वाचन करावे असे सुचवले सोबत असलेले नातेवाईक स्नेही मित्र-मैत्रिणी यांची लाभलेली साथ आणि आशीर्वादाच्या रूपात सोबत असलेले तिची आई तिचा भाऊ आणि तिच्या सासूबाई यांच्या बद्दल मनोगत व्यक्त करताना मानसी चापेकर यांचे डोळे भरून आले त्याच सोबत उपस्थितांच्या  डोळ्यातही पाणी आले.

प्रकाशक संजय शिंदे आणि कवी जनार्दन म्हात्रे यांनी मानसी चापेकर यांच्या  कवितेतील योगदानाबद्दल नमूद केले त्यांच्या वृत्तबद्ध कविता आणि गझल याविषयी जनार्दन म्हात्रे सुद्धा खूप छान बोलले. 

       अष्टगंध प्रकाशन तर्फे मानसी चापेकर यांच्या पहिल्या कवितासंग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. अत्यंत शानदार झालेल्या प्रकाशन सोहळ्याचे सुत्र संचलन अमेय रानडे यांनी केले.

Comments

  1. अभिनंदन मानसी ,पुस्तक प्रकाशन सोहळा अप्रतिम झाला.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog