म्हसळा तालुक्यात 'रंग दे माझी शाळा" उपक्रमातून शाळांना मिळणार नवी झळाळी

● 'आम्ही गिरगांवकर टीम' आणि 'श्री रविप्रभा मित्र संस्था" रायगड यांचा संयुक्त उपक्रम

जिल्हा परिषदेच्या दुरवस्था झालेल्या शाळांची केली पाहणी

म्हसळा - प्रतिनिधी श्रीकांत बिरवाडकर

'रंग दे माझी शाळा' हा सामाजिक उपक्रम घेऊन आम्ही गिरगावकर टीम आणि श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड संयुक्तपणे शनिवार, दि.22 एप्रिल 2023 रोजी आम्ही गिरगावकर टीमचे अध्यक्ष गौरव सागवेकर, सचिव मिलींद वेदपाठक, महिला सचिव शिल्पा नाईक यांचे प्रमुख मार्गदर्शनाखाली म्हसळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या नादुरुस्त शाळा इमारती व स्वच्छतागृहांची पाहणी केली. राज्यात अनेक जिल्ह्यातील तालुक्यांतील जिल्हा परिषद शाळांच्या इमारतींची व स्वच्छतागृहांची दुरवस्था झालेली पहायला मिळत आहे. राज्य शासनाने जिल्हा परिषदेच्या शाळांमधील सोयीसुविधांबाबतीत विशेष लक्ष देणे गरजेचे असून विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाचे शिक्षण देण्याबरोबरच विद्यार्थ्यांचे आरोग्य उत्तम कसे राहील यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना उपलब्ध करून देण्याची आवश्यकता आहे. या महत्त्वाच्या प्रश्नाकडे राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी 'रंग दे माझी शाळा' हा सामाजिक उपक्रम हाती घेऊन आम्ही गिरगावकर टीम आणि श्री रविप्रभा मित्र संस्था रायगड संयुक्तपणे जिल्हा परिषदेच्या शाळांची पाहणी केली असून शाळांचे नादुरुस्त इमारती व नीटनेटके, सुलभ स्वच्छतागृहाची उपलब्धता करून देण्यासाठी पुढाकार घेणार आहेत.

म्हसळा तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा घुम, राजिप शाळा रुद्रवट, राजिप शाळा ठाकरोली, राजिप मराठी शाळा म्हसळा नं.1 या शाळांची पाहणी केली असून येथील शाळांच्या इमारतींची दुरवस्था झालेली पहायला मिळते त्याचबरोबर विद्यार्थ्यांसाठी असणारे स्वच्छतागृहांची देखील मोठ्या प्रमाणात पडझड झालेली बिकट अवस्था आहे. तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांच्या इमारती व स्वच्छता गृहांची दुरवस्था झालेली असल्याने शासनाने याची दखल घेऊन शाळा दुरुस्ती साठी निधीची उपलब्धता केली पाहिजे. शाळांचे इमारतीना रंगरंगोटी करणे व स्वच्छता गृहांची उपलब्धता करून देणेसाठी आम्ही गिरगावकर टीम व श्री रविप्रभा मित्र संस्था सामाजिक जाणिवेतून हे प्रश्न मार्गी लावणार असल्याचे श्री रविप्रभा मित्र संस्थेचे संस्थापक, अध्यक्ष श्री.रविंद्र लाड यांनी शाळांची पाहणी करताना सांगितले आहे.

शाळा पाहणी दरम्यान श्री रविप्रभा मित्र संस्थेचे अध्यक्ष रविंद्र लाड यांचे समावेत शंकर कासार, संतोष उद्धरकर, सुशांत लाड, सरपंच केतन आग्रे, जेष्ठ सल्लागार पांडुरंग महागावकर, माजी उपसरपंच दामोदर महागावकर, गाव सचिव प्रसाद महागावकर, सहसचिव सतिश घोले, उपाध्यक्ष श्रीधर दर्गे, जेष्ठ सल्लागार रमेश आग्रे, म्हसळा शाळा नं.समिती अध्यक्ष शशिकांत उर्फ बाबू शिर्के, अजय करंबे, किशोर गुलगुले, संतोष घडशी यांसह शिक्षक वृंद उपस्थित होते.



Comments

Popular posts from this blog