"हरी उच्चाराने मोक्ष प्राप्त होतो"- ह.भ.प.अक्षय ओव्हाळ यांचे प्रतिपादन
खारी/रोहा -केशव म्हस्के
जन्माला आलेल्या प्रत्येक जीवाला निसर्ग सृष्टीच्या नियमानुसार एक दिवस त्या शिवाकडे जाणे आहेच परंतु जन्माला जीव हे सारे विसरून प्रपंचामध्ये एवढा गुंतला आहे की, प्रत्येकजण घरदार,पत्नी,पुत्र,धनसंपदा,आप्तस्वकीय नातेवाईक आदी संसारातील नाशिवंत गोष्टींना माझे माझे म्हणत असून हरी उच्चाराच्या नामस्मरणापासून वंचित राहू लागला आहे.खरे पाहता हरी उच्चाराने मोक्ष प्राप्त होतो कारण हरी हरी हरी मंत्र हा शिवाचा! म्हणती जे वाचा तया मोक्ष असे आरे बुद्रुक येथील वैकुंठवासी हभप. मंजुळा पांडुरंग पवार यांच्या अकराव्या अंतिम धार्मिक विधी निमित्ताने गुरूवार दिनांक.२७/एप्रिल रोजी कीर्तन सेवेप्रसंगी ह.भ.प.अक्षय महाराज ओव्हाळ(कोलाड - रोहा ) यांनी उपस्थितांना उदाहरणादाखल मौलिक मार्गदर्शन करताना सांगितले.
तालुक्यातील आरे बुद्रुक येथील नित्यनेमाने आळंदी - पंढरपूर वारी करणाऱ्या वारकरी सांप्रदायिक वैकुंठवासी हभप.मंजुळा पांडुरंग पवार यांच्या अंतिम धार्मिक विधी अकराव्या प्रसंगी कुणबी समाज नेते सुरेश मगर,लोक शाहीर अनंत मगर,सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग कडू,मामा मळेकर, जेष्ठ समाज सेवक तुकाराम पाखर,सुरेश शिंदे,पांडुरंग मोरे,पांडुरंग भोईर,अशोक वरणकर गायणाचार्य मनोहर पाडगे,किरण भोईर,संदेश कडव,मिलिंद पवार,मृदुंगाचार्य ओमकार उत्तेकर, कुंभोशी, गौळवाडी,गोफण, आरे खुर्द,खारी - रोहा आरे पंचक्रोशी परिसरातील वारकरी सांप्रदायिक भाविक मंडळी तसेच समस्त पवार,भोईर,शेळके,लहाने,आदी परिवारातील अप्त नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Comments
Post a Comment