ब्राह्मण मंडळ रोहाच्या रौप्यमहोत्सवी वर्षाला उत्साहात सुरूवात 


रोहा प्रतिनिधी  

                   रोहे शहर व परिसरातील ब्राह्मण ज्ञातीबांधवांची संस्था असलेल्या ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे परशुराम जयंतीचे औचित्य साधून शनिवार दिनांक 22 एप्रिल रोजी रौप्यमहोत्सवी वर्षाला उत्साहात सुरुवात करण्यात झाली. 

यानिमित्ताने रायगड जिल्ह्यातील सुप्रसिद्ध व्याख्याते तसेच प्रवचनकार डॉ.नंदकुमार मराठे यांचे भगवान परशुराम व ब्राह्मण्य या विषयावर व्याख्यान संपन्न झाले. या कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा ब्राह्मण संस्थेचे अध्यक्ष शरद म्हसकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. ब्राह्मण समाजातील ज्ञातीबांधवांनी या कार्यक्रमाला उत्तम प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती नोंदवली. 


रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त ब्राह्मण मंडळ रोहा तर्फे पुढील वर्षभर विविध उपक्रम राबवण्यात येणार असल्याचे ब्राह्मण मंडळ रोहाचे अध्यक्ष अमित आठवले व रौप्यमहोत्सवी समितीचे समन्वयक किशोर सोमण यांनी यावेळी जाहीर केले. 


यावेळी ब्राह्मण मंडळाच्या जडणघडणीत योगदान देणाऱ्या मंडळाच्या माजी अध्यक्षांचा सन्मान करण्यात आला. 

कार्यक्रमाचे सुत्र संचलन मंडळाचे सचिव निखिल दाते यांनी केले. 


कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ब्राह्मण मंडळ रोहा कार्यकारिणी सदस्य,  रौप्यमहोत्सव समिती सदस्य तसेच ब्राह्मण ज्ञातीबांधवांनी अथक परिश्रम घेतले.

Comments

Post a Comment

Popular posts from this blog