खारघर येथे झालेल्या पुरस्कार सोहळ्यात म्हसळा तालुक्यातील मृत्यू झालेल्या श्री सदस्यांची आमदार अदिती ताई तटकरे यांनी घेतली सांत्वन पर भेट
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार या कार्यक्रमात म्हसळा तालुक्यातील वारळ व मेंदडी या गावातील श्री सदस्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.उष्माघात व चेंगराचेंगरी मध्ये मृत्यू झाले. या दोन गावातील श्री सदस्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जनतेच्या हाकेला नेहमीच धावून जाणाऱ्या आमदार अदिती ताई तटकरे यांनी दोन्ही कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले व धीर दिला. खारघर येथील कार्यक्रमास आदिती ताई तटकरे उपस्थित होत्या. मृत्यू झालेल्या श्री सदस्यांच्या आत्म्यास शांती लाभो
Comments
Post a Comment